राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रदेशाध्यक्षांकडे सोपविला राजीनामा

जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रदेशाध्यक्षांकडे सोपविला राजीनामा

महिलेसोबत असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून एफआयआर दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत राजीनामा दिला आहे.पण  गेल्या ७२ तासांत आपल्यावर दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाहीची हत्या मी डोळ्यासमोर पाहू शकत नाही, त्यामुळे आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे आव्हाड म्हणाले. आव्हाड यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला. आव्हाड यांनी राजीनामा दिला असल्याचे जयंत पाटील यांनीआव्हाड यांच्या बरोबर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलतांना जयंत पाटील म्हणाले की व्यथित होऊन आव्हाड यांनी राजीनामा दिल्याचं कळलं. माझ्याकडे राजीनामा पाठवला. त्यामुळे मी सांगलीहून आलो. आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये, यासाठी मी प्रयत्न केले. जो गुन्हा कधी केलाच नाही, त्यासंदर्भात गुन्हा दाखल होत असेल तर योग्य नाही.

आव्हाड यांच्या एका जुन्या कार्यक्रमाची क्लिप दाखवल्यानंतर जयंत पाटील म्हणाले, या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड या महिलेचा बहीण असा उल्लेख करताना दिसत आहेत. हमारी बहेन तो मुंबई से आती है… असं आव्हाड या व्हिडिओत बोलताना दिसत आहेत. मग विनयभंगाचा गुन्हा दाखल कसा? असा सवाल पाटील यांनी केला. काल घडलेल्या घटनेमध्ये ३५४ कुठे बसते असेही ते म्हणाले. शिंदेनी क्लिप बघून निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले.शिंदे विरुद्ध आव्हाड असे चित्र निर्माण केलं जात असल्याचं सांगून जयंत पाटील म्हणाले की , जितेंद्र आव्हाड यांच्यावर असा आरोप करणं चुकीचं आहे. आव्हाड प्रचार न करता निवडून येतील असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

आव्हाडांच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस; सर्वसामान्यांचे हाल

आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांचे ‘अशुद्ध’ ट्विट व्हायरल

टिपू सुलतानाचा पुतळा बसवला तर बाबरी ढाचा सारखी अवस्था करू

समाजामध्ये माझी मान खाली झाली

राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना आव्हाड म्हणाले , समाजामध्ये माझी मान खाली झाली आहे. खुनाचा गुन्हा चालेल पण विनयभंगाचा नाही. माझ्यावरचा गुन्हा षडयंत्राचा भाग आहे असा आरोप त्यांनी केला. माझी बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. कोणत्याही कायद्याचं पालन न करता गुन्हा दाखल केला आहे. इतक्या खालच्या राजकारणाच्या पातळीत न राहिलेलं बरं असे आव्हाड यावेळी म्हणाले..

Exit mobile version