शिवसेनेचे शिवसेनेचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. राष्ट्रवादीच्या बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात दर्शन घेतले असल्याचा आरोप विजय शिवतारे यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मांसाहार करून पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणे टाळले होते. पण सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचा हा नियम मोडल्याची चर्चा रंगली आहे.
सुप्रिया सुळे यांच्या मटण खाण्यावरून नवीन राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
खासदार सुप्रिया सुळे या पुण्यात होत्या. त्यांनी पुण्यातील एका हॉटेलमध्ये मटणाचा आहार घेतला आणि नंतर त्यांनी महादेवाचे दर्शन घेतले. या संदर्भात शिवसेनेचे नेते यांनी सोशल मीडियावर ट्विट करत सुप्रिया सुळे यांचा मटणाचा आहार करतानाच व्हिडीओ आणि काही फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत.
आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले. येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला || अस आरोप शिवतारे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर केला आहे.
हे ही वाचा :
ब्रिस्बेनच्या लक्ष्मी नारायण मंदिरात मोदींविरोधी घोषणा
स्टम्प घेऊन आलेल्या हल्लेखोरांचे कोच कोण हे पण आम्हाला माहिती
संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात मोठी अपडेट, संशयाची सुई ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर
हिमंता बिस्वसर्मांनी राहुल गांधींवर केला ट्विट हल्ला!
जकार्तामध्ये तेल गोदामाला लागलेल्या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू
शिवतारे यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमधील व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळे या दोन तरुणांशी संवाद साधत आहे. हा व्हिडीओ एका हॉटेलमधील आहे. या दोन्ही तरुणांनी मटण थाळी ऑर्डर केली होती, यावेळी, सुप्रिया सुळे यांनी या तरुणांशी बोलताना आपण सुद्धा अशीच थाळी खाली असं म्हटल्याचं दिसत आहे. गेल्या वर्षी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी बाहेरून मांसाहार केला होता. त्यावेळी त्यांनी मंदिरात जाणे टाळले होते. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी वडिलांचा हा नियम मोडला अशी चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.