राष्ट्रवादीचे नेते मेमन म्हणतात, मोदींच कौतुक करायलाच हवं

राष्ट्रवादीचे नेते मेमन म्हणतात, मोदींच कौतुक करायलाच हवं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीची भुरळ आता त्यांच्या विरोधकांना पडायला सुरवात झाल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजीद मेमन यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भरभरून कौतुक केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा विरोधकांनी विचार करावा, त्यामागील कारण काय आहे हे पहावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

रविवारी, मेमन यांनी ट्विटरवर मोदींचे कौतुक करताना म्हटले की, “त्यांच्यात काहीतरी गुणवत्ता असेल किंवा त्यांनी चांगले काम केले असेल, जे विरोधी नेत्यांना समजले नाही. परंतु, काहीतरी आहे जे लोकांचं मन जिंकण्यास मदत करत आहे. त्यामुळेच ते जगातील सर्वात महान व्यक्ती बनत आहेत.”

“२०१४ साली नरेंद्र मोदी यांच्या विजयानंतर आणि त्यानंतरही पुढील दोन ते तीन वर्षे विरोधक हेच बोलत राहिले की इव्हीएम मशीनमध्ये काही घोळ होता म्हणून ते जिंकले. पण २०१९ मध्ये विरोधकांच्या अथक प्रयत्नांनंतरही आम्ही काहीच करू शकलो नाही. त्यामुळे माझं असं मत आहे की, त्यांच्यात काही चांगले गुण आहेत. उदाहरणार्थ त्यांच्याकडे चांगले भाषण कौशल्य आहे. ते काय बोलतात याचे कदाचित मी समर्थन करणार नाही पण त्यांच्याकडे तो गुण आहे की ते खिळवून ठेवतात. त्यांच्यातील दुसरा गुण म्हणजे ते १८ ते २० तास काम करतात. काही दिवसांपूर्वीच ऐकिवात आलं होतं की, ते केवळ दोन तासच झोपतात आणि हा एक वेगळा गुण त्यांच्यातला आहे आणि त्याचं कौतुक करायला हवंच,” असं मेमन म्हणाले.

हे ही वाचा:

हिंदू अल्पसंख्याक प्रकरणाचे शपथपत्रच सॉलिसिटर जनरलनी पाहिले नाही

उद्योगपती प्रशांत कारुळकर यांचा समाजभूषण पुरस्काराने सन्मान

भाजपाचा विजय साजरा करणाऱ्या मुस्लिम युवकाला उत्तर प्रदेशात केले ठार!

एक एक रुपया जमा करून त्याने घेतली ड्रीम बाईक

“विरोधकांनी चांगला अभ्यास करायला हवा, जाणून घ्यायला हवे, आत्मपरीक्षण करायला हवे की नरेंद्र मोदी यांना केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोक मानतात,” असे माजीद मेमन म्हणाले.

Exit mobile version