आमची शिवसेना, राष्ट्रवादीची शिवसेना असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी विधान केललं विधान राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आलेलं आहे. मनसे नेते संतोष धुरी यांनी याबाबातचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव जयंत पाटील यांनी केलेल्या विधानावर हसत असून त्याला होकार देताना दिसत आहेत.
हा प्रकार एका पत्रकार परिषदेच्या वेळी झाला. माध्यमांना बाईट देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मध्यभागी उभे असून त्यांच्या डाव्या बाजूला भास्कर जाधव आणि जयंत पाटील उभे होते. अजित पवार हे माध्यमांशी बोलण्याच्या आधी जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यात संवाद झाला अजित पवारांचं बोलणं सुरु होण्याआधी जयंत पाटील आमची शिवसेना, राष्ट्रवादीची शिवसेना असं म्हणाले. त्यावर भास्कर जाधव हसले आणि त्याला होकार दिला . या वाक्याचा त्यांनी पुनरुच्चारही केला.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदार बंडखोरी करत बाहेर पडले त्यावेळी आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. शिंदे गटातील आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे शिवसेना गहाण ठेवली असल्याची टीका अनेकदा करण्यात आली होती. ठाकरे गटातील नेत्यांनी वारंवार हे आरोप फेटाळून लावले होते. पण ठाकरे गटाच्याच नेत्याने आमची शिवसेना, राष्ट्रवादीची शिवसेना असं विधान केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याने हे पहिल्यांदाच मान्य केले अशी चर्चा रंगली . शिवसेना ही राष्ट्रवादीची बी टीम असल्याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे . राष्ट्रवादी काँग्रेसकडे गहाण ठेवलेली शिवसेना, आमची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेना.. पोटातलं ओठावर आलंच, असे म्हणत मनसे नेते संतोष धुरी यांनीही भास्कर जाधव यांना टोला लगावला.
हे ही वाचा :
माजी सैनिकांचे टेन्शन दूर, आता मिळणार पेन्शन
५४ वर्षांपूर्वी याच दिवशी मानव प्रथमच चंद्राच्या कक्षेत
मोदी सरकारची गरिबांना नववर्षाची भेट
राष्ट्रवादीची शिवसेना झाली हे काही चुकीचं नाही
राष्ट्रवादीची शिवसेना झाली हे काही चुकीचं नाही. आदित्य ठाकरे यांना काँग्रेसची लोकं जवळची वाटतात. त्यांना आपली लोकं नको झाली आहेत. आम्ही परत येतो पण दोन्ही काँग्रेसलाला सोडा असं म्हणत होतो. पण आम्हाला उद्धव ठाकरे यांनी तुम्ही देखील निघून जा म्हटलं होतं, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला आहे.