राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आज पहाटेच पुन्हा एकदा ईडीची धाड पडली आहे. गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी धाड आहे. आज पहाटेच इडीने ही दुसरी धाड टाकल्याने मुश्रीफ आता अडचणीत येणार आहेत. संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर हि धाड पडली आहे. कोलकत्त्यातील बोगस कंपन्यांमधून १५८ कोटी रुपये या कारखान्याच्या अकाउंटवर हस्तांतरित झाले होते. मुश्रीफ यांच्या घरी गेल्यावर लगेचच छाननी सुरु करण्यात आली आहे. ईडीकडून महत्वाची कागदपत्रे तपासली जात आहेत. या धाडीनंतर मुश्रीफ यांच्या समर्थकांनी त्यांच्या घराबाहेर गोंधळ घालण्यास प्रारंभ केला आहे. या धाडीची आम्हाला माहिती मिळाली पाहिजे अशी मागणी हे समर्थक करत आहेत. एका समर्थकाने तर डोके फोडून घेत या धाडीचा निषेध केला आहे.
या कारवाई मध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये म्हणून कडक सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या लगेचचच्या कारवाईमुळे मुश्रीफ यांना मोठा झटका बसला आहे. हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदार संघाचे ते नेतृत्व करतात. पश्चिम महाराष्ट्रात त्यांची पक्षातील मोठा मुस्लिम चेहरा म्हणून ओळख आहे. याशिवाय राजकारणात त्यांचा दबदबा आहे. आघाडी सरकारच्या काळात ते कामगार मंत्री झाले होते. तर मोदी सरकारच्या काळांत २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना विजय मिळाला होता. त्यांना भाजपकडून पक्षांत येण्याची ऑफर सुद्धा होती. पण त्यांनी त्याला नकार दिला होता.
हे ही वाचा:
पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती ‘सावित्रीबाई फुले’ यांना शतशः नमन
‘वंदे भारत’ला आता मिळणार टाटा स्टीलची मजबुती
मनीष सिसोदियांना हवी सहानुभूती; दारू घोटाळ्यापासून लक्ष हटविण्यासाठी पत्रप्रपंच
लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर १५ ठिकाणी छापे
का मारली आहे धाड?
संताजी घोरपडे साखर कारखाना घोटाळ्याप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर पहाटेच धाड पडली आहे. कोलकत्ता इथल्या बोगस कंपन्यांमधून १५८ कोटी रुपये या कारखान्यात जमा झाले होते. हि कंपनी कुठली?, १५८ कोटी रुपये आले कुठून, हा मनी लॉन्डरिंगचा पैसा आहे असा दावाच भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केला होता. शिवाय हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली होती. आता ईडीने हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास सुरवात केल्याचे दिसत आहे.