राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवार, १५ फेब्रुवारी रोजी पाच याचिकांवर महत्त्वाचा निर्णय दिला. शरद पवार गटाकडून तीन तर अजित पवार गटाकडून दोन याचिका सादर करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निकषांवरून पक्षाची राज्यघटना, पक्षाचं नेतृत्व आणि पक्षाचा विधिमंडळ गट यावरून निर्णय घेण्यात आल्याचे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची यावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीचं केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचे असल्याचा निर्णय दिला होता. त्यानुसारच नार्वेकरांनी निर्णय दिला आहे. तसेच अजित पवारांचे आमदार अपात्र नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि शरद पवारांच्या बाजूने असलेल्या आमदारांना देखील पात्र ठरवण्यात आलं आहे.
निकालात बहुमताचा विचार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमाताचा विचार करावा लागेल. अजित पवार यांच्याबाजूने ५३ पैकी ४१ आमदार आहेत. या बहुमताला शरद पवार गटाने आव्हान दिलेले नाही. त्यामुळे अजित पवार गटाला विधिमंडळ पक्षाचा पाठिंबा आहे. नेतृत्व संरचना किंवा पक्ष संघटनेवरून कोणता गट पक्ष आहे हे निश्चित होत नाही. त्यामुळे विधिमंडळ पक्षाच्या संख्याबळानुसार अजित पवार गट खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचं राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा संदर्भ घेत निकाल
विधिमंडळात असलेले बहुमत याच्या आधारे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची असल्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नार्वेकर देखील याचा आधार घेण्याची शक्यता होती. त्यानुसार नार्वेकरांनी विधिमंडळातील संख्याबळ आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा संदर्भ घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची असा निकाल दिला आहे.
हे ही वाचा:
माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात दिलासा नाही!
हवामानाचा अचूक अंदाज मिळणार; इस्रोकडून अत्याधुनिक उपग्रहाचे प्रक्षेपण
फारुख अब्दुल्ला यांनी इंडी आघाडीची साथ सोडली, स्वबळावर निवडणूक लढवणार!
कोल्हापुरात उद्धव ठाकरे यांना आणखी एक झटका
अजित पवारांची निवड पक्षाच्या घटनेनुसार झालेली नाही
राहुल नार्वेकर यावेळी निकाल देताना म्हणाले की, ३० जून २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. दोन्ही गटांनी मूळ राष्ट्रवादी आपली असल्याचा दावा केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेबाबत कोणताही वाद नाही. दोन्ही गटांना म्हणणं मांडण्याची संधी दिली. ३० जून नुसार अजित पवार यांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. त्यानुसार अजित पवार हे अध्यक्ष होतात. तरी अजित पवारांची निवड ही पक्षाच्या घटनेनुसार झालेली नाही, असं नार्वेकर म्हणाले. २९ जून पर्यंत कोणीही शरद पवारांच्या अध्यक्ष पदाला आक्षेप घेतला नव्हता. ३० जून रोजी शरद पवार पार्टी अध्यक्ष आहेत आणि अजित पवार अध्यक्ष असे दोन दावे करण्यात आले.