मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी महाराष्ट्रातील जातीय राजकारणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयानंतर महाराष्ट्रात जाती पातीच्या राजकारणाची सुरुवात झाल्याचा आरोप केला. याचं समर्थन करताना देशपांडे यांनी राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याची घणाघाती टीका केली.
संदीप देशपांडे म्हणाले, “राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि संकुचित राजकारण करायचं हे महाराष्ट्र गेले २० वर्षे बघत आहे. राष्ट्रवादीनं जे केलं ते राज ठाकरे बोलले आहेत, यात चुकीचं काही नाही.”
राष्ट्रवादी चे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि संकुचित राजकारण करायचं हे महाराष्ट्र गेले वीस वर्षे बघत आहे.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 17, 2021
यावेळी संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका करणाऱ्या प्रवीण गायकवाड यांनाही अप्रत्यक्ष इशारा दिला. जे कोणी आता राज ठाकरे यांच्या भूमिकेवर बोलत आहेत त्यांना योग्य उत्तर दिलं जाईल, असं मत संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलं. तसेच या पुढील भूमिका राज ठाकरे ठरवणार असल्याचंही स्पष्ट केलं.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांची लवकरच होणार सुटका
अफगाणिस्तान प्रश्नावर काय म्हणाले जो बायडन? वाचा सविस्तर
भागीदारी तुमची, पाप तुमचं आणि बोंब मोदी सरकारच्या नावाने!
भारतीय गोलंदाज लॉर्ड्स ऑफ क्रिकेट; भारताने इंग्लंडला नमविले
संदीप देशपांडे म्हणाले, “लोकलबाबत निर्णय झाला, पण अनेकांना पास मिळत नाहीत. दुसरा डोस अनेकांना मिळाला नाही. फक्त पास नको, तिकीट पण द्या. मुंबईत लस केंद्रं बंद ठेवली आहेत.”