नवाब मलिकांच्या जावयाचा जामीन रद्द होणार?

नवाब मलिकांच्या जावयाचा जामीन रद्द होणार?

महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला कोर्टाने दिलेला जामीन रद्द करण्यात यावा यासाठी एनसीबी मार्फत न्यायालयात अर्ज करण्यात आल्याचे समजते. चार दिवसांपूर्वीच एनसीबी मार्फत हा अर्ज करण्यात आला आहे. याच कारणामुळे नवाब मलिक हे एनसीबी विरोधात आक्रमक होऊन पत्रकार परिषद घेत एनसीबीवर आरोप करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी गुरुवार, १४ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर आरोपांच्या फैरी झाडल्या. एनसीबीने आपल्या जावयाला खोट्या गुन्ह्यात अडकवले असून त्याच्याकडून गांजा जप्त करण्यात आल्याचा दावा खोटा असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. तो गांजा नसून हर्बल तंबाखू असल्याचे अहवालात म्हटल्याचा आरोप मलिक यांनी केला. यावर प्रतिक्रिया देताना एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत अहवाल व्यवस्थित वाचावा असे म्हटले आहे.

हे ही वाचा:

आर्यन खान आणखी ६ दिवस तुरुंगातच

‘कोण जाणे पवारांना कसली वेदना आहे?’

सर्वाधिक मुले असलेल्या पालकांना मिझोराममध्ये दिले इनाम! कशासाठी ते वाचा…

जावयाच्या बचावासाठी नवाब मलिक रिंगणात

पण या सगळ्या दरम्यान समीर खान यांचा जामीन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे एनसीबीच्या सूत्रांनी म्हटले आहे. चार दिवसांपूर्वीच एनसीबीने न्यायालयात अर्ज केल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version