26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरराजकारणनक्षलवाद्यांनी जाहीर केली आरक्षणावरील भूमिका, वाचा सविस्तर...

नक्षलवाद्यांनी जाहीर केली आरक्षणावरील भूमिका, वाचा सविस्तर…

Google News Follow

Related

मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनात आता नक्षलवादी संघटनेने उडी घेतली आहे. “मराठा तरुणांनो दलालांपासून सावध राहा,” या आशयाची पत्रकबाजी गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून केली जात आहे. “आमच्यामध्ये सामील व्हा,” असं आवाहनही या पत्रकाच्या माध्यमातून नक्षलवाद्यांनी मराठा तरुणांना केलं आहे. हे सरकार केवळ अंबानी-अदानीचं आहे, त्यामुळे आरक्षण सोडून व्यवस्था बदलासाठी तयार राहा असं नक्षलवाद्यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य निर्मितीची आठवण करुन देत मराठा तरुणांना भावनिकदृष्ट्या आकर्षित करण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्याआड नक्षलवादी नवा डाव रचत आहेत. नक्षलीवादी या आंदोलनाचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नात आहेत.

नक्षलवाद्यांच्या पत्रकात म्हटलं आहे की, “मराठा समाजातून मूठभर जे दलाल भांडवलदार निर्माण झाले आहेत, तेच खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या अधोगतीला जबाबदार आहेत. या अधोगतीचं स्वरुप सामाजिक नसून आर्थिक आहे. या आर्थिक अधोगतीला कारणीभूत सरकारांचे आजवरचे धोरणे आहेत. तेव्हा मराठा समाजाने आपले खरे शत्रू ओळखले पाहिजे.”

हे ही वाचा:

मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले

देशात ७० दिवसातील सर्वात कमी कोरोना रुग्ण

भगवान जगन्नाथाच्या रथ यात्रेची तयारी सुरु

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट

“शिवबांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये मराठा समाजाने पुढाकार घेतला होता, पुन्हा पुढाकार घ्यायची वेळ आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मावळे बनावे लागेल. परत एकदा गनिमी काव्याचे डावपेच वापरावे लागतील. शत्रू, व्यवस्थेचे रखवाल, साम्राज्यवादाचे दलाल सत्ताधारी वर्ग आहेत. मित्र, सर्वच समाजातील गोरगरीब जनता आहे. मैदानात माओवादी शस्त्र उचलून लढत आहेत. लक्ष्य, मार्ग, साधने तयार आहेत. मराठा समाजातील शिवाजी महाराजांचा खरा आदर्श बाळगणाऱ्या मावळ्यांना आवाहन आहे की, त्यांनी रयतेचे खरे राज्य आणण्यासाठी मैदानात उतरावे. आपल्या संघटित शक्तीला क्रांतीकडे वळवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमची वाट पाहत आहोत,” असंही नक्षली संघटनेने या पत्रकात म्हटलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

  1. नक्षलवाद्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचा डाव कामीयाब नाही होणार & शिवाजी महाराज नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणा व्यवस्थित टायपिंग करा🙏

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा