नवाब मलिकांच्या मुलीची फडणवीसांना नोटीस

नवाब मलिकांच्या मुलीची फडणवीसांना नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यांनी देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत या संबंधीची माहिती दिली. मलिक यांनी दोन दिवसांपूर्वीच असे सांगितले होते की त्यांची मुलगी निलोफर या देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवतील. त्यानुसार कुटुंबाची बदनामी केली म्हणून निलोफर यांनी फडणवीसांना नोटीस पाठवली आहे.

या कायदेशीर नोटीसमध्ये निलोफर यांनी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. तसे न झाल्यास त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दिवाणी आणि फौजदारी खटला दाखल करणार असल्याचे निलोफर यांनी या नोटीसमध्ये म्हटले आहे. नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या घरात एनसीबीला ड्रग्स मिळाल्याचे फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते. तर आपल्या घरी कोणतेही ड्रग्स सापडले नसल्याचा दावा नवाब मलिक यांची मुलगी निलोफर आणि जावई समीर खान यांनी केला आहे.

त्यामुळेच फडणवीस यांनी केलेला आरोप खोटा असून त्यांनी आपली विधाने मागे घ्यावीत, माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे असे मलिक यांनी म्हटले आहे. तर संविधानाने राईट टू स्पिक दिला आहे, राईट टू अब्युज नाही असे नवाब मलिक यांनी सांगितले. तर याचवेळी मलिक यांनी गुजरात हे ड्रग्स व्यवसायाचे केंद्र बनलाय का? असा सवालही उपस्थित केला आहे.

हे ही वाचा:

‘या’ महापुरुषाची जयंती ठरली जनजातीय गौरव दिवस

पराभवाच्या भीतीने शिवसेनेला हुडहुडी भरली

इंग्लंडला धूळ चारत न्यूझीलंड अंतिम फेरीत

दोन वर्ष MPSC परीक्षा नाही, पण मुदतवाढ मात्र वर्षभराचीच

गुजरातमधील द्वारका येथून ३५० कोटी रुपयांचे ड्रग्स सापडल्यावरून नवाब मलिक हे आक्रमक झाले आहेत. के.पी गोसावी, मनीष भानुशाली, सुनील पाटील हे सर्व गुजरातमधील हॉटेलमध्ये थांबलेले. तिथूनच हे आपला व्यवहार करत होते. त्यामुळे ड्रग्सचे रॅकेट हे गुजरातमधून तर चालत नव्हते ना? असा सवाल मलिक यांनी विचारला आहे.

Exit mobile version