गेल्या काही दिवसांपासून मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक हे कोठडीत आहेत. नवाब मलिक यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होणार आहे. विशेष ईडी न्यायालयाने मंत्री नवाब मलिक यांच्या कोठडीत २० मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात आज सुनावणी झाली.
मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिक यांना ईडीनं अटक केली आहे. सध्या ते ऑर्थर रोड तुरुंगात आहेत. मंत्री नवाब मलिक यांना यापूर्वी दिलेली त्यांची कोठडी आज संपत असल्याने त्यांच्या कोठडीत आता पुन्हा वाढ करण्यात आली आहे. ईडीने मलिकांच्या प्रकरणात ५ हजार पेक्षा अधिक पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. त्यामुळे आता २० मे पर्यंत त्यांना कोठडीतच मुक्काम करावा लागणार आहे.
हे ही वाचा:
केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले; पंतप्रधान मोदींच्या नावाने पहिला रुद्राभिषेक
राज्यातील २८व्या महापालिकेची घोषणा
जम्मू-काश्मीरमध्ये सीमेलगत आढळले भुयार
‘कोरोना संपताच CAA लागू होणार’
कुख्यात गुंड दाऊदशी संबंध आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांना ईडीने अटक केली. कुर्ल्यातील मोक्याची जमीन कमी किंमतीत विकत घेतल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर एका पत्रकार परिषदेत केला होता. त्यासंदर्भात त्यांनी पुरावेही दिले होते. दरम्यान, कारवाईत नवाब मलिक यांच्या एकूण आठ मालमत्तांवर इडीने टाच आणली होती. कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंडसह आठ मालमत्ता नबाव मलिकांच्या ईडीने जप्त केल्या आहेत.