राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ झाली आहे. ४ एप्रिल पर्यंत त्यांची कोठडी होती, मात्र आता त्यात १८ एप्रिल पर्यंत वाढ झाली आहे. मनी लाँड्रिंगप्रकरणी गेल्या एक ते दीड महिन्यांपासून नवाब मलिक हे कोठडीत आहेत.
२३ फेब्रुवारीला मलिकांना ३ मार्च पर्यंत ईडीने कोठडी सुनावली होती. त्यानंतर तीन दिवस मलिक वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात होते. तेव्हा त्यांची चौकशी करता आली नाही म्हणून कोठडीत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर पीएमएलए न्यायालयाने मलिकांना आठ दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती.
पुढे ईडीने मलिकांची रवानगी तुरंगात केली. ईडीने केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याबद्दल मलिकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ईडीने केलेली कारवाई योग्य असल्याचे म्हणत न्यायालयाने नवाब मलिक यांना फटकारले होते. त्यानंतर २ एप्रिल रोजी मलिकांनी या संदर्भातच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
हे ही वाचा:
पुरोहित संतोष पाठक हत्येप्रकरणी हल्लेखोराला अटक
‘सलीम तुरुंगात गेला, आता जावेदही लवकरच जाणार’
‘महाराष्ट्र पोलीसांवर राज्य सरकारचा दबाव आहे’
श्रीलंकेत २६ मंत्र्यांनी दिला राजीनामा
कुख्यात गुंड दाऊदशी संबंध आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणात मलिकांना ईडीने अटक केले आहे. मालमत्ता खरेदी आणि गैरव्यवहार प्रकरणात मलिकांचा संबंध असल्याचा आरोप ईडीने केला आहे. कुर्ल्यातील एक जमीन कमी किंमतीत विकत घेतल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर पत्रकार परिषदेत केला होता. मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांकडून मलिक यांच्याशी संबंधित कंपनीने ही जागा विकत घेतल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. त्या संदर्भात पुरावेही दिले होते.