नवाब मलिकांच्या अटकेने मविआ बिथरली?

नवाब मलिकांच्या अटकेने मविआ बिथरली?

ईडीने काल महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना अटक केली. अंडरवर्ल्डच्या मदतीने काही लाख रुपयांना तीनशे  कोटींची मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. महाराष्ट्र विकास आघाडीने मलिकच्या अटकेविरोधात आंदोलने सुरु केली आहेत. मात्र, शिवसेनेचे प्रमुख नेत्यांनी या आंदोलनात सहभागी होण्यास उशीर केला. तर काही नेते आंदोलनात सहभागी नव्हते.

आघाडी सरकारमधील मंत्री अजित पवार, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, अस्लम शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि इतरांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेते नवाब मलिक यांच्या समर्थनातील आंदोलनात भाग घेतला. त्याचवेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुभाष देसाई नंतर या निदर्शनात सामील झाले आहेत.

मात्र शिवसेनेचे अनेक नेते या आंदोलनाला सामील नव्हते. याबाबत शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली की, काही शिवसेना नेते आणि मंत्री उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. तर काही नेते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथे होणाऱ्या भारदेवी यात्रेत सहभागी होण्यासाठी मुंबईबाहेर गेले आहेत. आदित्य ठाकरे, संजय राऊत, उदय सामंत आणि एकनाथ शिंदे हे प्रचारासाठी उत्तर प्रदेशात आहेत. तर अनिल परब हे देखील अंमलबजावणी संचालनालयाच्या  रडारवर आहेत, ते कोकण जिल्ह्यातील भराडी देवी यात्रेसाठी गेले आहेत.

हे ही वाचा:

नवाब मलिक राजीनामा द्या! भाजपाचे आंदोलन…

कोठडीत जाण्याची स्पर्धा

रशिया युक्रेन युद्धामुळे शेअर बाजार, तेलकिमतींवर विपरित परिणाम

टिपूऐवजी राणी लक्ष्मीबाई! सत्ता तुमची, मागणी कसली करता लबाडांनो?

तसेच सुनील राऊत यांनीही शिवसेनेचे नेते आंदोलनाला उपस्थित का नव्हते याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, “आंदोलनाचा निर्णय रात्री उशिरा घेण्यात आला. त्यामुळे आमदारांना जमवायला वेळ लागला आणि बरेच नेते प्रचारासाठी मुंबईबाहेर असल्यामुळे शिवसेना नेत्यांना आंदोलनाला येत आले नाही.

Exit mobile version