राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे आज १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) या संस्थेविरुद्ध भूमिका जाहीर करणार आहेत. या पत्रकार परिषदेचे जाहीर निमंत्रण त्यांनी पत्रकारांना दिले असून त्यात बुधवार, ६ ऑक्टोबर रोजी एनसीबीच्या कारवायांचा भंडाफोड करणार असल्याचा इशारा देत आहेत. राष्ट्रवादी भवन, बॅलार्ड इस्टेट येथे होणाऱ्या या पत्रकार परिषदेत एनसीबीवर शरसंधान करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नवाब मलिक यांचा जावई समीर खान याला ड्रग्स बाळगणे, खरेदी करणे, विकणे या आरोपांखाली अटक करण्यात आली होती. जानेवारीमध्ये त्याला अटक करण्यात आल्यानंतर तो तब्बल ९ महिने तुरुंगात होता. सप्टेंबरमध्ये त्याला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला. यासंदर्भात एनसीबीने म्हटले होते की, बँक व्यवहार आणि फोनच्या डेटाच्या आधारे समीर खानविरोधात पुरावे सापडले आहेत. समीर खानसोबत सेजनानी, फर्निचरवाला यांनाही जामीन देण्यात आला होता.
हे ही वाचा:
क्रूझवर पार्टीला परवानगी; मात्र रांगोळी, गरब्यावर बंदी
उलगडते आहे शेतकरी आंदोलनाचे खरे रूप
नवी मुंबईतील तलावाला धुतलेल्या कपड्यांची झालर
याबाबत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की, ड्रग्सप्रकरणी जावयाला अटक केली होती, तीच व्यथा बहुतेक नवाब मलिक मांडणार असतील. ड्रग्स तस्करांच्या व्यथा त्यांच्याइतक्या काला ठाऊक असणार?