नवाब मलिक यांनी दाऊद आणि सनातन संस्थेचा संबंध जोडत हिंदू संस्थांना बदनाम करायचे कारस्थान चालवले आहे असा आरोप सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केला. दाऊद आणि सनातन संस्था यांचा कोणताही संबंध नसून पुन्हा अशा प्रकारे बदनामी करायचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही सनातन संस्थेच्या मार्फत देण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, ९ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी बॉम्बस्फोटातील दोषींकडून जमीन खरेदी केल्याचा गौप्यस्फोट केला आहे. तर फडणवीसांच्या या आरोपांना नवाब मलिक यांनी आरोप करत प्रत्युत्तर दिले. यावेळी सनातन संस्थेने दाऊदची मालमत्ता विकत घेतल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. यावरून सनातन संस्था नवाब मलिक यांच्या विरोधात आक्रमक झाली आहे.
हे ही वाचा:
मुख्यमंत्र्यांना मणक्याचा त्रास; शस्त्रक्रिया होण्याची शक्यता
नवाब मलिक कुटुंबाला कशी मिळाली ३ एकरची जमीन अवघ्या ३० लाखाला
‘अभिनंदन राहुलजी, तुम्ही जगातील कमिशनचा रेकॉर्ड मोडला आहे’
ठाकरे सरकारचे कपडे अंडरवर्ल्डमध्ये भिजलेले
सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला आहे ज्यामध्ये ते म्हणतात, “आज महाराष्ट्रात ड्रग्सच्या प्रकरणात अत्यंत हीन पातळीवर राजकारण सुरू आहे. आज राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्यावर आतंकवादाच्या गुन्हेगारांकडून जमीन घेतल्याचा आरोप झालाय. तर आपली लंगडी बाजू सावरण्यासाठी त्यांनी सनातन संस्थेच्या नावाचा गैरवापर केला आहे हे आम्हाला लक्षात आलं. त्यांनी सनातन संस्था आणि दाऊद इब्राहिमची प्रॉपर्टी यांची एकत्रित चर्चा करून सनातन संस्था आणि हिंदू संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जो निषेधार्ह आहे. मी सांगू इच्छितो की दाऊदची रत्नागिरीतील प्रॉपर्टी होती ती केंद्र शासनाने लिलावात काढली होती. दिल्लीतील ॲडवोकेट अजय श्रीवास्तव यांनी ते विकत घेतली आहे आणि सनातन धर्माच्या प्रचारासाठी सनातन धर्म पाठशाळा या नावाने गुरुकुल सुरू करण्याचा संकल्प केला आहे. मात्र अजय श्रीवास्तव यांच्या आणि सनातन संस्थेचा कुठलाही संबंध नाही हे मी सांगू इच्छितो आणि मी नवाब मलिक यांनी अशाप्रकारे हिंदुत्ववादी संस्थांना बदनाम करू नये. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की त्यांनी नवाब मलिक या मंत्र्यांना समज द्यावी की त्यांनी जबाबदारीने वक्तव्ये करावीत. अंडरवर्ल्डशी सनातन संस्थेचा संबंध जोडण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न आहे, तो पुन्हा जर झाल्यास आम्ही कायदेशीर कारवाई करू असा इशाराही चेतन राजहंस यांनी दिला आहे.