नवाब मलिक लावणार चांदीवाल आयोगासमोर हजेरी

नवाब मलिक लावणार चांदीवाल आयोगासमोर हजेरी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे आज चांदीवाल आयोगासमोर हजर होणार आहेत. चांदीवाल आयोगाने मलिक यांना समन्स बजावले असून गुरुवार १७ फेब्रुवारी रोजी आयोगासमोर हजर राहण्याचे या समन्समध्ये म्हटले आहे. सचिन वाझे याच्या जबानी नंतर मलिक यांना समन्स पाठवण्यात आले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यासंदर्भात नवाब मलिक यांनी केलेल्या वक्तव्यावर खुलासा करण्यासाठी नवाब मलिक यांना समन्स पाठवण्यात आले होते. सचिन वाझे आणि परमबीर सिंह हेच अँटिलिया केसचे मास्टरमार्ईंड असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता. त्यांच्या याच वक्तव्यावर चांदीवाल आयोगाने त्यांना समन्स पाठवले आहे. नवाब मलिक यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्यावर खुलासा द्यावा असे चांदीवाल आयोगाने म्हटले आहे. त्यासाठी आज ११.३० वाजता ते आयोगासमोर हजर राहणार आहेत. सचिन वाझे याने त्याच्या वकिलाच्या माध्यमातून काही माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्या चांदीवाल आयोगासमोर सादर केल्या होत्या.

हे ही वाचा:

संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर

तळपत्या रवी, सूर्या समोर वेस्ट इंडीजचा संघ ढेर

पाकिस्तानी पत्रकारावर आयबी अधिकाऱ्यांचा हल्ला

मोहित कंबोज म्हणतात, म्हणून संजय राऊत यांना घाम फुटला!

यासंबंधी नवाब मलिक यांनी आज माध्यमांशी बातचीत केली असून परमबीर सिंग यांना अटक का करण्यात आली नाही? असा सवाल त्यांनी केला आहे. तर आज आपण जात पडताळणी आयोगाकडेही जाणार असल्याचे मलिक यांनी सांगितले आहे. समीर वानखेडे यांच्या विरोधात मलिकांनी जात पडताळणी आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारी संदर्भातच आपण आयोगाकडे जाणार असल्याचे मलिक यांनी सांगितले आहे.

Exit mobile version