अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत भाजपा मुंबईच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी माध्यमांना ही माहिती दिली.
“महाराष्ट्रात मंत्रीच सरकारी अधिकाऱ्यांना धमकावत आहेत. अशावेळी या प्रकरणात आता राज्यपालांनीच लक्ष घालावं अशी विनंती आम्ही त्यांना केली. ज्या पद्धतीने राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे बारा वाजलेले आहेत, त्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रकारही आता सुरु झाला आहे. नवाब मलिक यांना जर सरकारी अधिकाऱ्यांना अशा धमक्याच द्यायच्या असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा, सरकारी पदाचा अशा पद्धतीने दुरुपयोग करणं योग्य नाही. अशी मागणी आम्ही केली. राज्यपालकांनी आमचं निवेदन ऐकून घेतलं आणि या प्रकरणावर लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं. पुढील काही दिवस आम्ही या घटनाक्रमावर लक्ष ठेऊ, जर का नवाब मलिकयांच्यावर कारवाई करण्यात आली नाही तर आम्ही या प्रश्नावर राष्ट्रपतींची भेट घेऊ, केंद्रीय गृहमंत्र्यांचीही भेट घेऊ आणि गरज पडली तर न्यायालयातसुद्धा धाव घेऊ.” असं मंगल प्रभात लोढा म्हणाले.
महाराष्ट्र में सरकार में बैठे लोग जिस तरह से सरकारी अधिकारियों को धमका रहे हैं, यह बेहद निंदनीय है। इस विषय को लेकर महामहिम राज्यपाल मा श्री @BSKoshyari जी से भाजपा प्रतिनिधि मंडल ने मुलाकात की।
श्री @nawabmalikncp को यदि धमकियां देनी है, तो वे पहले अपने सरकारी पद का इस्तीफा दे। pic.twitter.com/unBbLCaztf— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) October 27, 2021
यापूर्वी समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनीही नवाब मलिक यांच्याविरूद्ध न्यायालयात जाणार असल्याची माहिती दिली होती. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत ज्ञानदेव वानखेडे यांनी समीर वानखेडेचे जातप्रमाणपत्र दाखवले. त्यात त्यांच्या नावापुढे ज्ञानदेव वानखेडे असेच लिहिल्याचे दिसत होते. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांत कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागू शकतो, असे ज्ञानदेव म्हणाले होते.
हे ही वाचा:
‘दाऊद आपल्या देशात नसला, तरीही त्याचा प्रभाव महाविकास आघाडी सरकारवर आहे’