नवाब मलिकांनी आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले

नवाब मलिकांनी आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले

ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अंडरवर्ल्डशी संबंध आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्याने नवाब मलिक यांनी आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकांशी आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी नवाब मलिक यांना ईडीने २३ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्यानंतर मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांना ४ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

दरम्यान, नवाब मलिक यांनी ईडीने केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. मात्र, ईडीने केलेली कारवाई योग्य असल्याचे म्हणत न्यायालयाने नवाब मलिक यांना फटकारले होते. तसेच मुंबई न्यायालयाने नवाब मलिक यांना दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे नबाव मलिक यांनी आता ईडीच्या कारवाई विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

हे ही वाचा:

भारत पाठवणार श्रीलंकेला ‘ही’ मोठी मदत

श्रीलंकेशी बात आणि चीनला लाथ

‘त्या’ घटनेनंतर विल स्मिथने हॉलिवूडच्या अकादमीचा दिला राजीनामा

वसईत एका वकिलाच्या घरावर धर्मांध मुस्लिमांकडून दगडफेक, गाडीची तोडफोड

कुर्ल्यातील एक मोक्याची जमीन तुटपुंज्या किंमतीत विकत घेतल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर पत्रकार परिषदेत केला होता. मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांकडून मलिक यांच्याशी संबंधित कंपनीने ही जागा विकत घेतल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. त्या संदर्भात पुरावे दिले होते.

Exit mobile version