महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडला आहे. नवाब मलिक यांच्यावर हल्ला चढवताना १९९३ च्या स्फोटातील दोषींकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस यांच्या आरोपांना नवाब मलिक यांनी आरोपांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकीकडे खरेदी व्यवहार केल्याचे मान्य करतानाच ‘मी उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडेन’ असे मलिक यांनी सांगितले आहे
देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत नवाब मालिकांवर चांगलाच बॉम्ब फोडला. या आरोपांना उत्तर देण्यासाठी आपण दोन वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे मलिक यांनी जाहीर केले. पण नवाब मलिक यांनी फडणवीसांनी केलेला कोणताही आरोप खोडून न काढता आपण जमीन खरेदीचा व्यवहार केल्याचे त्यांनी मान्य केले. एक प्रकारे त्यांनी फडणवीसांनी केलेले सर्व आरोप मान्य असल्याचेच कबूल केले.
हे ही वाचा:
‘अभिनंदन राहुलजी, तुम्ही जगातील कमिशनचा रेकॉर्ड मोडला आहे’
अँटॉप हिल परिसरात घर कोसळलं; ९ जणांना वाचवण्यात यश
१९९३ बॉम्बस्फोटाच्या गुन्हेगारांसोबत नवाब मलिकांचे व्यवहार
‘एसटीला भगवा दिला, पण कर्मचारी नागवा झाला’
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच ‘फडणवीस यांनी कोणते फटाके फोडले नाहीत, आवाज झाला नाही’ असा आव आणला. फडणवीस १९९९ साली या शहरात आले. त्या आधी गोपीनाथ मुंडे हे नेते होते. त्यांनी देखील अशाच प्रकारचे आरोप केले होते. माझ्या ६२ वर्षांच्या जीवनात आणि लोकप्रतिनिधी झाल्यानंतर २६ वर्षांच्या कारकिर्दीत कोणीही माझ्यावर अशाप्रकारचे आरोप करू शकला नाही. फडणवीस यांना माहिती देणारे व्यक्ती कच्चे खेळाडू आहेत असे त्यांनी म्हटले. तर मला सांगितलं असतं तर मी तुम्हाला कागदपत्रे दिली असती असा नवाबी तोराही मलिक यांनी मिरवला.
नवाब मलिक यांनी १० नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचे सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस यांचा अंडरवर्ल्डचा काय गेम राज्यात आहे, मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी अंडरवर्ल्डच्या सहाय्याने शहराला होस्टेज बनवलं होतं याचा खुलासा आपण करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.