जावई समीर खान अडचणीत येताच नवाब मलिक यांची एनसीबी विरोधात पुन्हा बोंबाबोंब

जावई समीर खान अडचणीत येताच नवाब मलिक यांची एनसीबी विरोधात पुन्हा बोंबाबोंब

राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीवर आरोपांची मालिका सुरू केली आहे. एनसीबीचा फार्जीवाडा थांबायचे नाव घेत नसल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी कथित संभाषणाची क्लिप व्हायरल करत एनसीबीकडून पंचांवर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. शुक्रवार ३१ डिसेंबर रोजी एनसीबीने नवाब मलिक यांचा जावई समीर खान याचा जामीन रद्द व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. यावरूनच आता नवाब मलिक यांनी पुन्हा एनसीबीवर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली आहे.

नवाब मलिक यांनी आज एक ऑडिओ क्लीप माध्यमांच्या समोर ठेवली आहे. यामध्ये दोन व्यक्ती एका प्रकरणावर बोलत असून या प्रकरणात कशा पद्धतीने खोटे पंच उभे करण्यात आल्याचा आरोप नवाब मलिकांनी एनसीबीवर केला आहे.

यातील एका क्लिपमध्ये मॅडी नावाचा पंच विचारतो की, ‘या प्रकरणात आधीच एवढ्या अडचणी सुरू आहेत. काही होणार तर नाही ना?’ तेव्हा समीर वानखेडे म्हणतात की बिनधास्त जाऊन भेट असे या ऑडिओ क्लिपमधून समोर येत असल्याचे नवाब मलिक म्हणाले. यापूर्वीही नवाब मलिक यांनी एनसीबी आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले होते.

हे ही वाचा:

समाजकार्याच्या नावावर भलतेच कार्य करणाऱ्या संस्थाना मोदी सरकारचा दणका

… हे आहे बिपीन रावत यांच्या हेलीकॉप्टर दुर्घटनेमागचे खरे कारण

शिवसेनेला राज्यपालांकडून दणका; आश्रय योजनेची होणार चौकशी

भारताची व्हॅक्सिन मैत्री पुन्हा सुरू; अफगाणिस्तानला दिले पाच लाख लसीचे डोस

गेल्या काही महिन्यांपासून मलिक हे सातत्याने वानखेडे कुटुंबियांवर आरोप करत आले आहेत. कधी ज्ञानदेव वानखेडे यांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचा आरोप, तर कधी समीर वानखेडे यांचे लग्न मुस्लिम पद्धतीने झाल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. त्यामुळे शेवटी ज्ञानदेव वानखेडे यांनी त्यांच्याविरोधात सव्वा कोटींचा दावा दाखल केला होता आणि त्यानंतर मलिक यांच्यावर न्यायालयाने लगाम घातला होता. त्यानंतरही न्यायालयाचा अवमान केल्याने न्यायालयाने नवाब मलिक यांना फटकारले होते.

Exit mobile version