अनिल देशमुख यांच्यासह आर्थर रोड तुरुंगात नवाब मलिकही

अनिल देशमुख यांच्यासह आर्थर रोड तुरुंगात नवाब मलिकही

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून आजही दिलासा मिळालेला नाही. ईडीने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. आता नवाब मलिक यांची आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. सध्या याच तुरुंगात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेदेखील आहेत. त्यामुळे मलिक यांना झालेल्या या तुरुंगवासाची वेगळी चर्चा सुरू झाली आहे.

२३ फेब्रुवारीला मनी लाँड्रिंग प्रकरणात ३ मार्च पर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती. मात्र २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान मलिक वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात होते. त्यामुळे त्यांची चौकशी करता आली नाही. त्यानंतर त्यांची ईडी कोठडी न्यायालयाने ७ मार्च पर्यंत वाढवली होती. आज ७ मार्च रोजी सुटका होणार होती मात्र पुन्हा न्यायालयाने त्यांच्या कोठडीत वाढ केली आहे. अजून १४ दिवसांची म्हणजेच २१ मार्च पर्यंत न्यायालयाने मालिकांना कोठडी सुनावली आहे.

त्यामुळे नवाब मलिक जामिनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वीही मलिकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संदर्भात ईडीने त्यांच्यावर दाखल केलेला मनी लाँड्रिंगचा खटला रद्द करण्याची मागणी करत त्यांनी १ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी नवाब मलिक यांनी आपल्या याचिकेत आपली अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. आणि तात्काळ सुटका करण्याची मागणी केली होती.

ईडीने म्हटले आहे की, नवाब मलिक यांनी त्यांच्या चौकशीदरम्यान अजिबात सहकार्य केल नाही. चौकशीदरम्यान प्रश्नांची उत्तरं नवाब मलिक यांनी व्यवस्थीतपणे दिली नाहीत, तपासादरम्यान काही बाबी समोर आल्या त्यानुसार हे स्पष्ट होतंय की मनी लाँडरिंगच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांच सुख आजही ते घेत आलेत. नवाब मलिक हे महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री आहेत.त्यामुळे ते त्यांचा ताकदीचा वापर करू शकतात. तपासाची दिशा आणि इतर बाबी याची त्यांना आता पूर्णपणे कल्पना आहे त्यामुळे ते बाहेर आल्यास पुरावे नष्ट करू शकतात किंवा संशयित व्यक्तीना अलर्ट करू शकतात.

मलिक यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी ईडीने केली त्यानुसार कोर्टाने त्यांना कोठडी सुनावली आहे.

कारागृहात रोज घरच्या जेवणाचा डबा येऊ देण्यासाठी मलिकांच्यावतीनं कोर्टात अर्ज करण्यात आला आहे. यावर जेलप्रशासनाचं सविस्तर उत्तर घ्यावं लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. नवाब मलिकांच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीला विरोध केला आहे. ईडीच्या कारवाईला हायकोर्टात दिलेलं आव्हान अद्याप प्रलंबित असल्याचा दावा वकिलांनी केला आहे.

हे ही वाचा:

… म्हणून भारतीय महिलांचं होतंय कौतुक!

‘नेत्यांच्या गाडीवर चप्पलफेक करणाऱ्यांवर कोणता गुन्हा दाखल करणार आहात?’

‘कृषीप्रधान महाराष्ट्र सरकारला काय लकवा मारलाय काय?’

युद्धाचा परिणाम शेअर बाजारावर; सेन्सेक्स १३०० अंकांनी कोसळला

कुर्ला येथील एक जागा नवाब मलिक यांनी काही लाख रुपयांना दाऊदच्या संबंधित लोकांकडून खरेदी केली, असा आरोप नवाब मलिक यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये नवाब मलिक यांचा मुलगा फराझ मलिक आणि त्यांचा भाऊ अस्लम मलिक यांची ईडीने चौकशी केली होती.

Exit mobile version