नवाब मलिक माझ्या मृत आईवर हल्ले करत आहेत

नवाब मलिक माझ्या मृत आईवर हल्ले करत आहेत

अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या कुटुंबावर आरोप केल्यानंतर आज समीर वानखेडे यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. “माझ्या मृत आईवर हल्ले केले जात आहेत आणि मला सतत अटकेची धमकी दिली जात आहे.” असं वानखेडे म्हणाले.

वानखेडे यांनी मुंबई न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की त्यांच्याविरोधात केलेले बदनामीकारक आरोप केवळ खोटेच नाही तर दिशाभूल करणारे, खोडसाळ आणि अपमानजनक आहेत.

मलिक हे ड्रग्स विरोधी एजन्सीचे (एनसीबी) प्रमुख टीकाकार आहेत. वानखेडे यांच्या जन्माशी संबंधित दस्तऐवजाचा फोटो ट्वीट करून त्यांनी दावा केला, “बनावटपणा इथून सुरू झाला आहे.”

मलिक यांच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना वानखेडे म्हणाले की, “मंत्री नवाब मलिक यांच्याशी संबंधित समीर खान नावाच्या एका व्यक्तीला अटक केल्यामुळे कदाचित नवाब मलिक असे आरोप करत असतील. त्याला एनसीबीने एनडीपीएस कायद्यांतर्गत अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अटक केली होती. तेव्हापासून माझ्याविरुद्ध आणि माझ्या कुटुंबाविरुद्ध सूडबुद्धीने कारस्थान रचले जात आहे.”

हे ही वाचा:

मला चुकीच्या पद्धतीने अडकवले जात आहे, वानखेडे यांनी लिहिले पत्र

… म्हणून त्याने मारली राज्यपालांच्या कानशिलात!

नाशिकमधील शिवसैनिकांना पडला उद्धव ठाकरेंचा विसर!

कुणाल जानी कलानगरमधील मंत्र्याच्या जवळचा

ते पुढे म्हणाले, “काही (नेत्यांना) निष्पक्ष आणि प्रामाणिक तपास व्हायला नको असल्यामुळे माझ्यावर कारवाई करून मला अटक करण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून माझं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सगळं मी करेन. कोर्टाने कृपया निष्पक्ष आणि प्रामाणिक चौकशी टिकून राहावी याबाजूने निकाल द्यावा.”

Exit mobile version