मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. गेल्या तीन दिवसांपासून मलिक यांना ताप आणि उलटीचा त्रास होत होता. सोमवार, २ मे रोजी दुपारी ते कारागृहात पडले आणि त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांचा रक्तदाबही नियंत्रीत नव्हता. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समोर आले आहे.
मलिक यांची तब्येत काही दिवसांपासून बिघडली आहे. आज अचानक त्यांना जास्त त्रास झाल्याने त्यांना व्हिलचेअरवरुन रुग्णालयात दाखल करण्यात आले. नवाब मलिक यांच्या वकीलांनी आज पीएमएलए न्यायालयात वैद्यकीय कारणांच्या आधारावर तात्पुरत्या जामीनाची मागणी केली होती. या सुनावणीदरम्यान ही गोष्ट समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वीच रिमांडला विरोध करण्यासाठी नवाब मलिक यांनी अर्ज दाखल केला होता. स्टेज दोनच्या क्रॉनिक किडनी रोगामुळे त्यांना पाय दुखणे आणि सूज येण्याची तक्रार केली होती. याआधीही नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली होती, त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास जाणवत असल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हे ही वाचा:
‘४८ तासांत उद्धव, संजय राऊत माफी मागा…’
वीजसंकटावर गृहमंत्री अमित शहा उचलणार पाऊल
‘संजय राऊतांनी बाबरी मशीदीवर बोलणं म्हणजे हलकटपणाचा कळस’
दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने अटक केल्यानंतर नवाब मलिक यांनी न्यायालयात धाव घेऊन ही अटक चुकीच्या पद्धतीने केल्याचे म्हटले होते, मात्र, न्यायालयाने नवाब मलिक यांना दणका देत ईडीने केलेली अटक कायद्यानुसारच असल्याचे म्हणत त्यांची याचिका फेटाळून लावली होती.