गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आर्थर रोड कारागृहात आहेत. सध्या मलिकांना विशेष पीएमएलए न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. नवाब मलिकांनी वैद्यकीय कारणासाठी जामिनाची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नसला तरी न्यायालयाने मलिकांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली आहे.
अनेक महिन्यांपासून नवाब मलिक ईडी कोठडीमध्ये आहेत. मलिकांना जेजे रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले होते. परंतु त्यांना ज्या व्याधी आहेत त्यावर जेजे रुग्णालयात उपचार होऊ शकत नाही अशी माहिती नवाब मलिकांनी दिली होती. त्यामुळे त्यांनी न्यायालयात वैद्यकीय कारणासाठी जामिनाची मागणी केली होती. नवाब मलिकांच्या आजारावर खासगी रुग्णालयात उपचार केले पाहिजेत असे पत्र रुग्णालयाकडून न्यायालयात देण्यात आले होते. त्यानुसार, न्यायालयाने मलिकांना असलेल्या व्याधीचा विचार करता, त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. यामुळे न्यायालयाने नवाब मलिकांना परवानगी दिली आहे. मलिकांसोबत घरातील एका व्यक्तीला राहण्याची परवानगी दिली आहे. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी हे आदेश दिले आहेत.
हे ही वाचा:
‘सत्तेसाठी ठाकरे सरकारने हिंदुत्व गहाण ठेवले’
कराची बाजारपेठेत स्फोट; तीन ठार
एनआयएच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी अतुलचंद्र कुलकर्णींची नियुक्ती
यापूर्वी मलिक यांना ताप आणि उलटीचा त्रास होत होता. त्यावेळी त्यांना जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यावेळी त्यांचा रक्तदाबही नियंत्रीत नव्हता आणि त्यावेळी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. तसेच रिमांडला विरोध करण्यासाठी नवाब मलिक यांनी अर्ज दाखल केला होता. स्टेज दोनच्या क्रॉनिक किडनी रोगामुळे त्यांना पाय दुखणे आणि सूज येण्याची तक्रार केली होती.