24 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरराजकारणगृहमंत्र्यांऐवजी मलिकांनीच घेतली पत्रकार परिषद

गृहमंत्र्यांऐवजी मलिकांनीच घेतली पत्रकार परिषद

Google News Follow

Related

रोज नवनवे आरोप करण्यासाठी प्रसिद्ध असलेले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आता नवा आरोप केला आहे. अमरावतीच्या परिस्थितीबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नेमकी माहिती देणे अपेक्षित असताना नवाब मलिक यांनीच पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले की, अमरावतीत दंगल भडकाविण्यासाठी भाजपानेच कट रचल्याचा आरोप आता मलिक यांनी केला आहे. ही दंगल भडकाविण्यासाठी मुंबईहून पैसे आले होते, भाजपाच्या आमदाराने हे पैसे वाटले होते, त्याची चौकशी सुरू आहे, असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सध्या गडचिरोलीत असून तेथे नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या जवानांचा सत्कार करण्यासाठी ते तिथे गेले आहेत. पण तेवढ्यात नवाब मलिक यांनी अमरावतीतील सगळ्या घटनेची चौकशी झाल्याचे सांगत त्याविषयी पत्रकारांना माहिती दिली.

ते म्हणाले, त्रिपुरामध्ये न घडलेल्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी रझा अकादमीने मोर्चा काढला होता. त्यात हिंसाचार झाला आणि दुकानांची तोडफोड, दगडफेक झाली. त्यात पोलिसही जखमी झाले. भाजपाने दुसऱ्या दिवशी बंद पाळला. त्यावर नवाब मलिक म्हणाले की, भाजपाच्या अनिल बोंडे यांनी षडयंत्र रचले. दारू वाटली गेली, पैसे वाटण्यात आले आणि दंगल भडकाविली गेली. पोलिस चौकशीत ही माहिती मिळाल्याचे मलिक यांनी सांगितले.

 

हे ही वाचा:

एनसीबीची कारवाई; जळगावमधून ४९ पोती गांजा जप्त

महापौरांसह अनिल बोंडे यांना अटक, नागपूरमध्ये १४४ कलम लागू

‘कितीही आवाज दाबला तरी हिंदू मार खाणार नाही’

शिवशाहिरांनी ठेवलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श सतत प्रेरणा देतील

 

त्रिपुरात घटना घडल्यावर मुस्लिमांमध्ये नाराजी होती, असे सांगत नवाब मलिक म्हणाले की, त्या नाराजीतून मुस्लिम संघटनांनी बंदचे आवाहन केले होते. त्यानंतर तिथे दगडफेक झाली, पोलिसांवरही हल्ले झाले. पण पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. जे हुल्लडबाज आहेत त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे.

त्यानंतर या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांवर मलिक घसरले. त्यांनी लोकांवर या यंत्रणा दबाव आणत असल्याचा राग आळवला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा