26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामा१९९३ बॉम्बस्फोटाच्या गुन्हेगारांसोबत नवाब मलिकांचे व्यवहार

१९९३ बॉम्बस्फोटाच्या गुन्हेगारांसोबत नवाब मलिकांचे व्यवहार

Google News Follow

Related

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, ९ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांची पोलखोल केली आहे. नवाब मलिक यांनी १९९३ सालच्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांसोबत मालमत्तेचे व्यवहार केले असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांचे सज्जड पुरावे असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तर अशा एकूण पाच मालमत्तांशी संबंधित व्यवहारांची कागदपत्र असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत हा धमाका केला आहे. फडणवीसांच्या या धमाक्यामुळे नवाब मलिक आणि महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फडणवीस यांनी या आधीच १ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेत दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार फडणवीस यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

यावेळी बोलताना फडणवीस यांनी सुरवातीलाच स्पष्ट केले की, ‘मी जे सांगतोय ती ना सलीम जावेद यांची स्टोरी आहे, ना इंटरव्हल नंतरचा सिनेमा आहे. तर ही अतिशय राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे.’ या वेळी त्यांनी या परकरणातील दोन महत्त्वाची नावे घेत त्यांशी पार्श्वभूमी सांगितली.

यातील पहिले नाव म्हणजे सरदार शहावली खान जो १९९३ सालचे बॉम्बस्फोटातील आरोपी आहे आणि त्यासाठी ते जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. बॉम्ब कुठे ठेवायचा ह्याची रेकी याने केली. तर टायगर मेमनच्या घरी आरडीएक्स भरणारा हा शहावली होता. त्याच्या विरोधात खटला चालवून, प्रत्यक्षदर्शी माफीच्या साक्षिदारांच्या आधारे ह्याला शिक्षा सुनावली.

हे ही वाचा:

‘अभिनंदन राहुलजी, तुम्ही जगातील कमिशनचा रेकॉर्ड मोडला आहे’

अँटॉप हिल परिसरात घर कोसळलं; ९ जणांना वाचवण्यात यश

भोपाळमधील रुग्णालयाला आग; ४ बालकांचा मृत्यू

‘एसटीला भगवा दिला, पण कर्मचारी नागवा झाला’

दुसरा नाव आहे सलीम पटेल. काही वर्षांपूर्वी स्वर्गीय आर.आर. पाटील एका इफ्तार पार्टीला गेले आणि त्यांचे दाऊदच्या माणसासोबत फोटो अशी बातमी चालली. तो दाऊदचा माणूस म्हणजे हा सलीम पटेल. हा दाऊदची बहीण हसीना पारकर हीच तो ड्रायव्हर, बॉडीगार्ड होता. हसीना आपा ज्यांना म्हणतात त्या हसीना पारकरसाठी हा वसुली करायचा.

सलीम पटेल आणि सरदार शहावली खान यांनी मिळून कुर्ला येथील लाल बहादूर शास्त्री मार्ग येथील एका मोक्याच्या ठिकाणी असलेली २.८० एकर जमिनीची विक्री केली. ह्या दोघांच्या नावे या जमिनीची पॉवर ऑफ ऍटर्नी होती. ही जमीन एका कंपनीने खरेदी केली. ही कंपनी म्हणजे सॉलिडस कंपनी. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबाची आहे.  काही काळ स्वतः नवाब मलिकही या कंपनीत संचालक होते. नवाब मलिक यांच्या चिरंजिवांनी या व्यवहारात सह्या केल्या आहेत. आजही ही जागा मलिक कुटुंबाच्या सॉलिडस कंपनीच्या मालकीची असून त्यांना या जागेतून दर महिना १ कोटी रुपये भाडे येते. 

एकूण ३० लाखांत रुपयांत ही जमीन खरेदी करण्यात आली आणि त्यापैकी फक्त २० लाख रुपये रक्कम देण्यात आली. यापैकी  १५ लाख रुपये सलीम पटेल याच्या अकाउंटला जमा झाले. तर शहावली खानच्या अकाउंटला १० लाख जमा झाले. यापैकी सलीम खानची संपूर्ण १५ लाखांची पावती आहे. तर शहावली याला ५ लाख दिले आणि ५ लाख नंतर देण्यात येतील असे लिहिले गेले.

ही जमीन बाजार भावापेक्षा कमी किंमतीत घेण्यात आली. २००३ ते २००५ या कालावधीत हा सर्व व्यवहार झाला तेव्हा नवाब मलिक हे मंत्री होते. मग तेव्हा मलिक यांना माहित नव्हते का की हे दोघे दहशतवादी आहेत? त्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांकडून जमीन का घेतली? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे.

हा व्यवहार झाला तेव्हा या दोघांना ‘टाडा’ लावलेला होता. ‘टाडा’ ज्यांना लागतो त्यांची सर्व मालमत्ता सरकार जप्त करते. मग अशा परिस्थितीत त्यांची मालमत्ता वाचवण्यासाठी हे करण्यात आले का? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. मुंबईच्या गुन्हेगारांसोबत नवाब मलिक यांनी व्यवहार का केले असा सवालही त्यांनी विचारला आहे.

आपण ही सर्व कागदपत्रे आणि पुरावे तपास यंत्रणांना पाठवणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. तर  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठवणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे फडणवीसांच्या या पत्रकार परिषदेनंतर हे प्रकरण नेमके कोणत्या दिशेने जाणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा