मलिक खरंच आजारी आहेत हे पटवून द्या, अन्यथा वाट पहा

उच्च न्यायालयाचे आदेश

मलिक खरंच आजारी आहेत हे पटवून द्या, अन्यथा वाट पहा

‘नवाब मालिकांच्या जामिनावर तातडीने सुनावणी हवी असल्यास ते खरंच आजारी आहेत हे आधी आम्हाला पटवून द्या’ असे निर्देशच मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मलिक यांच्या जमीन अर्जावर आज न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली तेव्हा नवाब मलिक यांनी जामिनासाठी हायकोर्टात अर्ज केला होता त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. त्यावर मालिकांच्या वकिलांना , तुमच्या आधी आलेली बरीच प्रकरणे आमच्यासमोर प्रलंबित असून तुम्हाला थोडी वाट बघावी लागेल अन्यथा नवाब मलिक खरेच आजारी आहेत हे तुम्हाला पटवून द्यावे लागेल असे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक म्हणाले आहेत.

जामिनाला ईडीचा विरोध

नवाब मलिक यांच्या जामीन अर्जाला ईडी जोरदार विरोध करत आहेत. एएसजी अनिल सिह यांनी ईडीतर्फे बाजू मांडली . सिंह यांनी पीएमएलए कायदा यातील कलम ४५ या तरतुदीनुसार आजारी नाहीत असा दावा केला त्यानंतर हायकोर्टाने नवाब मालिकांच्या जामीनावरील सुनावणी आठवडाभरासाठी तहकूब केली आहे. आता पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीला ठेवण्यात आली आहे. शिवाय दोन्ही बाजूच्या वकिलांना केवळ नवाब मलिक यांच्या वैद्यकीय अहवालावर युक्तिवाद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मालिकांच्या वकिलांचे युक्तिवाद   

नवाब मालिकांचे वकील अनिल देसाई यांनी यावेळेस कोर्टाला सांगितले की, मलिकांची एक किडनी निकामी असून एकाच किडनीवर सध्या ते आहेत. ईडी त्यांना इस्पितळातून डिस्चार्ज घेण्यासाठी घाई करत आहे. कुर्ला येथील क्रिटिकेअर रग्णालयात ते गेले अनेक महिने उपचार घेत आहेत किडनी ट्रान्सप्लांट साठी त्यांना दुसऱ्या चांगल्या इस्पितळात उपचार घ्यायचे आहेत. अशी माहिती त्यांनी कोर्टाला दिली . न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी अनिल देशमुख यांना प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मंजूर करण्यात आला. असे सांगितले मात्र न्यायमूर्तींनी तातडीने दिलासा देण्यास नकार दिला. शिवाय पुढील सुनावणीत फक्त तब्बेतीवरच युक्तिवाद करण्याचे निर्देश दोन्ही बाजूच्या वकिलांना देण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

रेल्वेच्या ओव्हरहेड व्हॅनने आपल्याच ४ कर्मचाऱ्यांना चिरडले

लोकसभा सचिवालयाची राहुल गांधी यांना हक्कभंगाची नोटीस

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या चावीमुळे बंजारा समाज विकासाच्या मार्गावर

महापालिकेसाठी भाजप मिशन १५० घोषित

काय आहे प्रकरण?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले नवाब मालिकांनी अशा लोकांकडून जमीन घेतली जे १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात आरोपी होते. ही जमीन दाऊद इब्राहीमशी संबंधित असून नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर ईडीने मनी लौंड्रीन्ग प्रकरणी नवाब मालिकांवर गुन्हे दाखल करत कोट्यवधींची संपत्ती जप्त केली आहे.

Exit mobile version