राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री समोर हजर राहिले असून त्यांनी आपण आयोगा विषयी कधी बोललो नाही किंवा बोलणार नाही असे सांगितले आहे. त्यांनी आयोगाच्या सुरू असलेल्या चौकशी बद्दल आपण कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नसल्याचेही म्हटले आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यासंदर्भात नवाब मलिक यांनी केलेल्या वक्तव्यावर खुलासा करण्यासाठी नवाब मलिक यांना समन्स पाठवण्यात आले होते. सचिन वाझे आणि परमबीर सिंह हेच अँटिलिया केसचे मास्टरमार्ईंड असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता. त्यांच्या याच वक्तव्यावर चांदीवाल आयोगाने त्यांना समन्स पाठवून त्यांनी केलेल्या वक्तव्यावर खुलासा द्यावा असे चांदीवाल आयोगाने म्हटले होते. त्यासाठी आज ११.३० वाजता ते आयोगासमोर हजर झाले.
आयोगासमोर हजेरी लावून जबाब नोंदविल्यानंतर नवाब मलिक यांनी बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला. मला १५ तारखेला आयोगाने समन्स बजावले होते. पण या नोटीस मध्ये मला हजर राहण्याची गरज नाही असे सांगितल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. तर आयोगाने आज दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर सचिन वाझेचा अर्ज फेटाळल्याचेही मलिक यांनी सांगितले.
हे ही वाचा:
संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला
शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा
तळपत्या रवी, सूर्या समोर वेस्ट इंडीजचा संघ ढेर
मी आयोगाबद्दल काहीही बोललो नाही. भविष्यातही मी आयोगाबद्दल काही बोलणार नाही हे स्वीकारले आहे. मी अनिल देशमुख यांच्याबाबतही बोललो नाही असे मलिक यांनी सांगितले पण त्याच वेळी सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांनी चूक केली असेल तर बोलण्याचा अधिकार नक्कीच आहे असे देखील मलिक म्हणाले.