गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात आहेत. नवाब मलिकांना किडनी आणि इतर काही व्याधींमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मलिकांना सध्या कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नवाब मलिकांनी वैद्यकीय कारणासाठी जामिनाची मागणी केली होती. मात्र, मलिकांचा जामिन फेटाळत न्यायालयाने त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार मंगळवार, १७ मे रोजी मलिकांना कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी मलिकांना ताप आणि उलटीचा त्रास झाला होता. त्यावेळी त्यांना जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनतर त्यांनी स्टेज दोनच्या क्रॉनिक किडनी रोगामुळे त्यांना पाय दुखणे आणि सूज येण्याची तक्रार केली होती. त्यासाठी मलिकांना जेजे रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले होते. परंतु त्यांना ज्या व्याधी आहेत त्यावर जेजे रुग्णालयात उपचार होऊ शकत नाही अशी माहिती नवाब मलिकांनी दिली होती. त्यामुळे त्यांनी न्यायालयात वैद्यकीय कारणासाठी जामिनाची मागणी केली होती.
हे ही वाचा:
ज्ञानवापी प्रकरणात माहिती लीक केली; आयुक्त मिश्रांची हकालपट्टी
मंदिर पाडून ज्ञानवापी मशीद उभारल्याचा सलमान खुर्शीद यांचा दावा
‘या’ दिवशी अयोध्येतील राम मंदिर होणार भाविकांसाठी खुलं
गुंतवणूकदारांना एलआयसीने केले निराश
नवाब मलिकांच्या आजारावर खासगी रुग्णालयात उपचार केले पाहिजेत असे पत्र रुग्णालयाकडून न्यायालयात देण्यात आले होते. त्यानुसार, न्यायालयाने मलिकांना असलेल्या व्याधीचा विचार करता, त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली. उपचारादरम्यान मलिकांसोबत घरातील एका व्यक्तीला राहण्याची परवानगी दिली आहे.