दोन दिवसांपासून ईडी कोठडीत असलेले राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडी कोठडीत प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती समोर आली आहे.
२४ फेब्रुवारी रोजी नवाब मलिकांच्या वतीने वकिल तारक सय्यद यांनी विशेष न्यायालयात तीन याचिका दाखल केल्या होत्या. यामध्ये नवाब मलिकांना वकिलाच्या उपस्थितीत नवाब मलिक यांची चौकशी करण्याची परवानगी द्यावी तसेच त्यांना घरचे जेवण आणि औषध द्यावे अशी मागणी करण्यात आली होती.
याबाबत मुंबईच्या विशेष न्यायालयाने मंत्री नवाब मलिक यांची वकिलाच्या उपस्थितीत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच नवाब मलिक यांना ईडीच्या कोठडीत त्यांच्या अमीर मलिक या मुलाकडून घरचे जेवण आणि औषध देण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, न्यायालयाने कोणालाही नवाब मलिक यांच्याशी बोलण्याची परवानगी दिलेली नाही.
हे ही वाचा:
श्रीलंकेच्या भारतीय राजदूतांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट
‘यशवंत जाधवांवर झालेल्या कारवाईचे स्पष्टीकरण पक्षप्रमुखांनी द्यावे’
आयपीएल २०२२चा रणसंग्राम मुंबई, पुण्यात; या तारखेपासून सुरू होणार सामने
युद्धाने कोणतेही प्रश्न सुटू शकत नाहीत; पंतप्रधान मोदींचा पुतीन यांना सल्ला
‘मलिक यांना त्यांची औषधे सोबत ठेवण्यास अनुमती दिली आहे. तसेच त्यांना हवी असतील ती औषधे ईडीने उपलब्ध करावीत. मलिक यांच्यासाठी ईडीने ठरवलेल्या वेळेतच घरचे जेवण पोहोचवण्यासाठी अमर मलिक यांना परवानगी दिली आहे. ईडीने ठरवलेल्या वेळेचे अमर यांनी पालन करावे. तसेच त्यांनी या परवानगीचा कोणत्याही प्रकारे गैरवापर करू नये. त्यांच्याकडून गैरवापर होत असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यास ही परवानगी रद्द केली जाईल.’ असे न्यायाधीशांनी आदेशात स्पष्ट केले आहे. अटक झाल्यानंतर मविआने मलिकांच्या समर्थनार्थ तर भाजपाने मलिकांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केले होते.