पालघरमध्ये नौदल अधिकाऱ्याला जिवंत जाळले

पालघरमध्ये नौदल अधिकाऱ्याला जिवंत जाळले

राज्यातील पालघरमधील भारतीय नौदलाच्या जवानाला जिवंत जाळल्याप्रकरणी भाजपाने उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात अराजकतेचं वातावरण असल्याची टीका भाजपा आमदार राम कदम यांनी केली. “इथे कोणीच सुरक्षित नाही, इथे साधू सुरक्षित नाही आणि इथे जवानही सुरक्षित नाहीत.” असेही राम कदम म्हणाले.

राम कदम यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. यापूर्वीही पालघरमध्ये साधूंना निर्दयीपणे मारहाण करत त्यांचा खून करण्यात आला होता. संपूर्ण साधू समाजाला सरकारकडून न्यायाची अपेक्षा आहे. राज्य सरकारला त्यांना न्याय द्यावाच लागेल. सुरज कुमार दुबे आयएनएस अग्रणी कोइंबतूरमध्ये लीडरशिप ट्रेनिगं एस्टेब्लिशमेंटमध्ये तैनात होते. ते गेल्या सहा महिन्यांपासून बेपत्ता होते. शुक्रवारी संध्याकाळी मुंबईतल्या एका नाल्यात ते जखमी अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना तात्काळ नेव्ही रुग्णालयात नेण्यात आले, तिथेच त्यांनी प्राण सोडले.

सूरज कुमार दुबे 30 जानेवारीला सुट्टी संपल्यानंतर सेवेत रुजू होण्यासाठी कोईंबतूरला जात होते. 30 जानेवारीच्या संध्याकाळी रांचीवरून ते विमानानं हैदराबादला पोहोचले. परंतु हैदराबादेतून ते अचानक बेपत्ता झाले, त्यांचे दोन्ही मोबाईल बंद लागत होते.

त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती आणि पलामूतील एसपींकडे त्यांना शोधण्याची मागणी केली होती. पलामू पोलिसांनी हैदराबाद पोलिसांशी संपर्क साधून जवानाला शोधण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान सूरज मुंबईत जखमी अवस्थेत सापडले. त्यांच्यावर मुंबईतल्या नेव्ही रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शरीर अधिक जळल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितलं जात आहे. सूरजला जिवंत जाळून नाल्यात फेकण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

Exit mobile version