नवनीत राणांचा लोकसभा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा; जात प्रमाणपत्र वैध

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवनीत राणांचा लोकसभा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा; जात प्रमाणपत्र वैध

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना जात प्रमाणपत्र प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायलयाने नवनीत राणा यांना दिलासा देत मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल रद्द केला आहे. अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बोगस ठरवणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. दरम्यान, नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदार संघातून भाजपाकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल दिला होता. तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत त्यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे.

हे ही वाचा:

मोदी सरकारच्या यशस्वी बचाव मोहिमा; मोदी ठरले संकटमोचक!

“आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला भक्कम बनविण्यासाठी पंतप्रधान मोदींनी दहा वर्षात पाया रचला”

छत्तीसगडमध्ये ८ तास चाललेल्या चकमकीत १३ माओवादी ठार!

विजेंदर सिंगचा काँग्रेसला ठोसा!

२०१३ मध्ये नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र मिळाले होते. नवनीत राणा यांना मोची जातीचे प्रमाणपत्र दिले होते. जात पडळताडणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र वैध ठरवले होते. त्याविरोधात माजी खासदार आनंदराव अडसूळ उच्च न्यायालयात गेले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने जात पडळताडणी समितीचा निर्णय रद्द करत राणा यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले होते. २०१९ उमेदवारी अर्ज भरताना बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचा आरोप राणा यांच्यावर करण्यात आला होता. दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे. नवनीत राणा या भाजपाकडून अमरावतीमधून खासदारकीची निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे.

Exit mobile version