काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मातोश्रीवर हनुमान चालीसा पठणासाठी मुंबईला आले होते. त्यानंतर त्यांना राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक होऊन सुटकाही झाली. त्यांनतर त्यांनी सार्वजनिक ठिकाणी हनुमान चालीसा पठणाची भूमिका सुरूच ठेवली. मात्र बुधवार, २५ मे रोजी नवनीत राणा यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला आहे. हनुमान चालीसा म्हटली तर जीवे मारू, अशी धमकी त्यांना देण्यात आली आहे.
नवी दिल्ली येथे नवनीत राणा यांनी नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने तो मुस्लिम धर्मगुरू असल्याचे सांगितले आहे. आणि स्वतःचे नाव कादरी असे त्याने सांगितले आहे. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही हनुमान चालीसा पठण केले तर जीवे मारू, अशी धमकी त्या व्यक्तीने नवनीत राणांना दिली आहे.
हे ही वाचा:
लाखाच्या कर्जासाठी लहान मुलांसह स्वतःच केली ऊसतोड
आता दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीनेही घालायचे हेल्मेट
शिवसेनेचे नेते यशवंत जाधव ईडीच्या रडारवर
राणा दाम्पत्य हे हनुमान चालीसा पठण करणार या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे ते मातोश्रीवर हनुमान पठणासाठी मुंबईला आले होते. मात्र त्यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांच्या इमारती समोर राडा केला. आंदोलने घोषणाबाजी केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यांनतर राणा दाम्पत्यांची केसच बोगस असल्याचे त्यांचे वकील रिझवान यांनी सांगितले होते.