ठाकरे सरकारवर नवनीत राणा यांचा हल्लाबोल

ठाकरे सरकारवर नवनीत राणा यांचा हल्लाबोल

महाराष्ट्रातील स्थगिती सरकार अशी ओळख असणाऱ्या ठाकरे सरकारवर अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. त्यासंबंधीचा व्हिडियोदेखील चांगलाच गाजत आहे.

सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर चालू असलेल्या या अधिवेशनात बोलताना नवनीत राणा ठाकरे सरकारवर कडाडल्या. विविध मुद्द्यांवरून त्यांनी सरकारले खडे बोल सुनावले.

आपल्या भाषणाची सुरूवात करताना त्यांनी ठाकरे सरकारच्या कोरोना काळातील सुमार कामगिरीवर टिका केली. “माझे कुटुंब माझी जबाबदरी असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी माझा महाराष्ट्र माझी जबाबदारी म्हणून एक टक्काही घेतली नाही.” त्याच वेळी महाराष्ट्र सरकारने मृत्युदर देखील लपवला असेही त्यांनी यावेळी म्हटले.  या भाषणात अनेक मुद्द्यांचा नवनीत राणा यांनी समाचार घेतला. जलयुक्त शिवार, मुंबई मेट्रो कारशेड, बुलेट ट्रेन, मराठवाडा वॉटर ग्रिड, सीएम फेलोशिप आदी प्रकल्पांना स्थगिती देणाऱ्या सरकारची महाराष्ट्रात स्थगिती सरकार म्हणून ओळख असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले. त्याशिवाय अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करणाऱ्या रवि राणा आणि इतर शेतकऱ्यांना मुंबईत येऊ न देता गाडीतच अडकवून ठेवले होते आणि आता याच पक्षाचे नेते शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे ही यांची दुटप्पी भूमिका असल्याचे देखील त्या म्हणाल्या.

याव्यतिरिक्त, मोदी सरकारच्या विविध योजनांचा झालेला फायदा विषद करून त्याबद्दल राणा यांनी सरकारचे आभार देखील मानले.

Exit mobile version