“नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर जिंकल्यासारखं वाटलं”

नवनीत राणा यांची प्रतिक्रिया

“नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर जिंकल्यासारखं वाटलं”

लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला. यानंतर, नवनीत राणा यांनी पहिल्यांदा माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी पराभवावर भाष्य करत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणाही साधला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीला गेलेल्या नवनीत राणा या नुकत्याच महाराष्ट्रात परतल्या असून त्यांनी नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर मी जिंकल्यासारखं वाटलं. फक्त मनात एका गोष्टीची खंत आहे, २०१९ मध्ये अमरावतीच्या जनतेने मला अपक्ष उमेदवार असतानाही दिल्लीत पाठवले, पण यावेळी असं काय केलं की २०२४ मध्ये जनतेने मला अमरावतीतच थांबण्यास भाग पाडले? माझा पराभव केला. याचा नक्कीच विचार करणार आहे,” अशा भावना नवनीत राणा यांनी व्यक्त केल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नवनीत राणा म्हणाल्या की, “उद्धव ठाकरे निवडणुकीपूर्वी स्पष्ट शब्दांत म्हणाले होते की आम्ही शपथ घेऊ आणि नरेंद्र मोदींनी शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देऊ. पण, दिवसा स्वप्न बघणाऱ्या उद्धव ठाकरेंना माहिती नाही की आम्ही महाराष्ट्रात किती काम केलं आहे. येत्या काळात महाराष्ट्रातील जनता आम्हालाच प्रतिसाद देईल. लोकसभा निवडणुकीमधील मतांचे प्रमाण पाहिल्यास भाजपाला सर्वाधिक मतं मिळाली आहेत. उद्धव ठाकरे ज्या सुरात नरेंद्र मोदींना निमंत्रण देऊ असं बोलत होते, त्यांनी आता पाहिलं असेल की खरा वाघ कोण आहे.

हे ही वाचा..

भारताप्रमाणे, पाकिस्तान मुक्त, निष्पक्ष निवडणुका का घेऊ शकत नाही?

तिसऱ्या कार्यकाळातील पहिली भेट इटलीला दिल्याचा आनंद

‘इज ऑफ डुईंग बिझनेस’च्या ऍडिशनल प्रोग्रॅम सेक्रेटरी पदी संजय ढवळीकर यांची नियुक्ती!

सरसंघचालकांचे खडे बोल, नेमके कोणासाठी?

दरम्यान, यावेळी राणा यांनी प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला. नवनीत राणा म्हणाल्या, “काही लोक मैदान जिंकण्यासाठी निवडणूक लढवतात, तर काही लोक दुसऱ्यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करतात.” अमरावती लोकसभा मतदारसंघ काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे यांना ५,२६,२७१ मिळाली. तर, नवनीत राणा यांना ५,०६,५४० मतं मिळाली. यामुळे राणा यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Exit mobile version