शिंदे फडणवीस सरकारवर सुषमा अंधारे या सातत्याने टीका करत असतात. त्यांच्या या टीकांना खासदार नवनीत राणा यांनी सडेतोड उत्तर देत थेट उद्धव ठाकरे यांनाचं त्यांनी खोचक टोला लगावला आहे. नवनीत राणा यांनी ‘आळशी माणूस ऑफ द इयर’ असं उद्धव ठाकरे यांना संबोधलं आहे.
सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टिकेसंदर्भात नवनीत राणा यांना विचारणा केली असता त्यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केलं. तसेच आपण सुषमा अंधारेंना ओळखत नसल्याचं नवनीत राणा यावेळी म्हणाल्या आहेत. नवनीत राणा म्हणाल्या, एकतर मी त्यांना ओळखत नाही आणि त्या ज्या पद्धतीने टीका करत आहेत तो फक्त अभिनय आहे. त्यांनी आधी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. तसेच त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सगळ्यात आळशी माणूस म्हटलं आहे. मला नवल वाटतंय. त्यांना जर आळशी माणूस शोधायचा असेल तर त्यांनी मातोश्रीमध्ये जाऊन शोधावं. तिथेच आळशी माणूस त्यांना भेटेल.
‘आळशी माणूस ऑफ द इयर’ कुणाला शोधायचा असेल, तर त्यांना त्यांच्याच पक्षाच्या अध्यक्षांना शोधता येईल. ५६ वर्षात उद्धव ठाकरे जेवढे फिरले नसतील, तेवढे या तीन महिन्यांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फिरले असतील. त्यामुळे आळशी माणूस कोणाला पाहायचा असेल तर त्यांनी मातोश्रीवर गेलं पाहिजे, असा खोचक टोला राणा यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
हे ही वाचा:
‘या’ कारणामुळे ४० हजार कंपन्यांना लागणार टाळे
उपमुख्यमंत्री विठुरायाचरणी! शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं जीवन सुजलाम सुफलाम व्हावं
‘सामना’च्या पहिल्या पानावरील जाहिरातीमुळे भगवंत मान आठवले
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पायाला लागली गोळी
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांचा वाद चर्चेचा विषय बनला आहे. आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांना वाद मिटवून शांततेचा सल्ला दिल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले आहे. जनतेची जबाबदारी आमच्यावर आहे. याकडे लक्ष दिलं पाहिजे असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.