‘उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी केलेले काम दाखवावे माझ्याकडून बक्षीस मिळेल’

रवी आणि नवनीत राणा दांपत्याचा हल्लाबोल

‘उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी केलेले काम दाखवावे माझ्याकडून बक्षीस मिळेल’

संजय राऊत यांनी सुतळी बॉम्बचा फोटो शेअर करत मोठा बॉम्ब फोडण्याचे जाहीर केले होते, त्यावर आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी हल्लाबोल केला आहे. राऊत यांनी विदर्भात येऊन बॉम्ब फोडण्याची भाषा करू नये, आधीच त्यांचे चाळीस आमदार गेले हाच एक मोठा महाराष्ट्रासाठी बॉम्ब असल्याचे राणा दांपत्य यावेळी म्हणाले.

आम्ही जर का बॉम्ब फोडला तर राऊत आणि उद्धव ठाकरे दिसणार सुद्धा नाहीत. याशिवाय आदित्य आणि उद्धव ठाकरे दोघेही तुरुंगात जातील असेही ते या वेळेस म्हणाले. सत्ता असताना अडीच वर्षात संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी केलेले काम दाखवावे मी बक्षीस देईन असेही राणांनी स्पष्ट केले. तर राऊत यांच्या ट्विट वर कोणता बॉम्ब कोण फोडणार , यात विदर्भातील लोकांना रस नाही असे खासदार नवनीत राणा यांनी म्हंटले आहे

हे ही वाचा:

सुनील गावस्कर यांच्या मातोश्रींचे निधन

संजय राऊत यांचे योगदान आणि प्रतिकांची चोरी

त्या जुन्या व्हीडिओंचे हिशेब अंधारेबाई देतील काय?

संजय राऊत यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान काय?

नागपूरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे सध्या नागपुरातच आहेत.अधिवेशनादरम्यान संजय राऊत यांनी सुतळी बॉम्ब चा फोटो ट्विट केला. त्यांवरून आपण मोठा बॉम्ब फोडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.तर काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बोलण्यात यात साधी एखादी लवंगी पण नसल्याचे स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बॉम्ब फोडला, तर संजय राऊतांना कुठं पळायचं आणि कुठं लपायचं सुचणार नाही. त्यामुळे बॉम्ब फोडण्याची भाषा विदर्भ आणि नागपूरमध्ये येऊन राऊतांनी करु नये,” असं आमदार रवी राणांनी म्हटलं आहे.

Exit mobile version