अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर झाली असून भाजपाकडून त्या लोकसभेची निवडणूक लढणार आहेत. त्या भाजपाच्या अमरावतीमधील अधिकृत उमेदवार असणार आहेत.
भाजपाने विविध राज्यांतील उमेदवारांची यादी जाहीर केली त्यात महाराष्ट्रातील अमरावतीच्या जागेची घोषणा करण्यात आली. ही जागा नवनीत राणा यांना देण्यात आली आहे. भाजपाने आतापर्यंत २३ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यातील २० उमेदवार आधीच जाहीर केले आहेत. तर तीन उमेदवार नंतर जाहीर केले गेले.
हे ही वाचा:
संजय राऊतांची कन्या वाईन कंपनीची संचालक; १ हजार कोटींचा वाईन स्कॅम
नोकरीसाठी तरुणांना थायलंडमध्ये नेले, छळ केला; मुंबईत दोघांना अटक
ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकरांना ईडीचे समन्स
मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये झुळूक पवन दावुलुरी यांची
गेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार होत्या. पण नंतर समीकरणे बदलली. भाजपाचे समर्थन त्या नंतर करू लागल्या. आता त्यांच्यासमोर आव्हाने असतील. आनंदराव अडसूळ आणि बच्चू कडू यांचा नवनीत राणा यांना विरोध आहे. नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या दोघांनीही राणा यांच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे म्हटले आहे.
बच्चू कडू यांनी म्हटले आहे की, आमचा विरोध कायम आहे. एकूणच आम्ही नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही आणि त्यांना ही निवडणूक सोपी जाणार नाही.
नवनीत राणा यांनी यासंदर्भात पंतप्रधान मोदींचे खूप खूप अभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप खूप धन्यवाद. माझ्या अमरावतीच्या लोकांनी मला इथे आणले. मी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचेही आभार मानते.