जातीवरून हिणवत छळ केल्याचा नवनीत राणांचा आरोप

जातीवरून हिणवत छळ केल्याचा नवनीत राणांचा आरोप

न्यायालयीन कोठडीत असलेल्या खासदार नवनीत राणा यांना हीन दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. खासदार नवनीत राणा यांच्यासोबत पोलिस चुकीच्या पद्धतीने वर्तन करत असल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे.

आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला अशा प्रकारची वागणूक मिळत असल्याचा गंभीरता आरोप राणा यांनी केला आहे. मला पोलिसांनी पाणीही दिले नाही असा दावा नवनीत राणा यांचा आहे.

हे ही वाचा:

‘ठाकरे सरकार हे बेईमानीने आलेले सरकार’

‘ठाकरे सरकारचे वर्तन हिटलर पद्धतीने’

मशिदीवरील भोंगे उतरणार नाहीत! ठाकरे सरकारची भूमिका

सोमय्या यांच्यावरील हल्ल्यानंतर केंद्रीय गृहसचिव आवश्यक पावलं उचलणार

काय लिहिले आहे राणा यांच्या पत्रात?
‘मला २३ एप्रिल रोजी खार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. संपूर्ण रात्र मी तिथे होते. यादरम्यान, तहान लागल्याने मी पिण्यासाठी पाणी मागितले पण ते दिले गेले नाही. मी मागासवर्गीय असल्याने इतरजण वापरत असलेल्या ग्लासमधून तुम्हाला पाणी देता येणार नाही, असे ड्युटीवरच्या पोलिसांनी मला सांगितले. हा प्रकार माझ्यासाठी धक्कादायक होता. मला बाथरूमही वापरू दिला गेला नाही. जातीवरून हिणवत माझा छळ करण्यात आला. मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली’

राणा यांचे हे आरोप अत्यंत गंभीर असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्याची दखल घेतली आहे. फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे.

Exit mobile version