‘या’ प्रकरणात नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाचा कारावास

‘या’ प्रकरणात नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाचा कारावास

सर्वोच्च न्यायालयाने पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना एका प्रकरणात शिक्षा सुनावली आहे.

३४ वर्ष जुन्या रोड रेज प्रकरणात त्यांना न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात त्यावेळी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पतियाळा येथे १९८८ मध्ये नवज्योत सिद्धू यांचे पार्किंगवरून भांडण झाले होते ज्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. यापूर्वी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावून त्यांची सुटका केली होती. त्याविरोधात पीडित पक्षाने पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी करताना देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना या प्रकरणी एक वर्ष तुरुंगात काढावे लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचवेळी सिद्धूची शिक्षा कमी करू नये, असे याचिकेत स्पष्ट म्हटले आहे. या आदेशानुसार सिद्धू यांना पंजाब पोलिस ताब्यात घेतील. आता आयपीसीच्या कलम ३२३ अंतर्गत सिद्धू यांना जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हे ही वाचा:

मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरींना न्यायालयाचा दिलासा! अटकपूर्व जामीन मंजूर

काँग्रेसचे जोखड सोडल्यावर जाखड भाजपावासी

‘सत्तेचा टांगा पलटी, आणि सत्ताधारी फरार’

राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या, ईडीकडून गुन्हा दाखल

हे रोड रेज प्रकरण सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. पटियालाच्या सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी १९९९ मध्ये सिद्धू आणि त्यांच्या साथीदाराला या खटल्यातील पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले होते. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ज्यामध्ये उच्च न्यायालयाने सिद्धू आणि अन्य आरोपींना तीन वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सिद्धू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Exit mobile version