विधिमंडळात घुमल्या घोषणा
तुमच्या ‘बां’चं नाही, आमच्या ‘दिबां’चं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव असले पाहिजे, अशा घोषणा विधिमंडळाच्या परिसरात सोमवारी घुमल्या. भाजपाच्या आमदारांनी दिबांचे नाव विमानतळाला देण्यात यावे म्हणून तीव्र निदर्शने विधिमंडळात अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केली.
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव या विमानतळाला दिलेच पाहिजे, अशी स्थानिकांची मागणी आहे. या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या वतीने ठेवण्यात आला आहे. पण स्थानिकांचे म्हणणे आहे की, नाव हे दि. बा. पाटील यांचेच दिले गेले पाहिजे. त्यावरून सोमवारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर दि. बा. पाटील यांच्या नावाचे बॅनर बनवून त्यांचेच नाव या विमानतळाला देण्यात यावे, अशी आग्रही मागणी केली गेली.
हे ही वाचा:
ट्विटर अखेर तक्रार अधिकारी नेमणार
ठाकरे सरकारचा धोरणलकवा विद्यार्थ्यांच्या मुळाशी
वारीला बंदी म्हणजे द्रौपदीच्या पदराला हात घालण्याचे पाप
भाजपाचे १२ निलंबित आमदार ५:४५ वाजता राज्यपालांना भेटणार
प्रश्न फक्त नाही नावाचा, आहे भूमिपुत्रांच्या अस्तित्वाचा, हुतात्म्यांच्या बलिदानाचा, स्थानिकांच्या स्वाभिमानाचा अशा घोषणा लिहिलेले बॅनर भाजपा आमदारांनी फडकाविले आणि दि. बा. पाटील यांच्या नावाची आग्रही मागणी केली.
भूमिपुत्र आगरी समाजाच्या हिताचे रक्षण करणारे ज्येष्ठ नेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे या मागणीसाठी भाजपाच्या आमदारांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पाहिल्या दिवशी जोरदार निदर्शने केली. pic.twitter.com/ZF4IlQ1Ilg
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 5, 2021
दि. बा. पाटील यांचे नाव या विमानतळाला दिले जावे यासाठी गेले अनेक दिवस नवी मुंबईतील नागरिकांकडून आंदोलन केले जात आहे. दि. बा. पाटील यांच्या नावाकरता भूमिपूत्र विरुद्ध ठाकरे हा संघर्ष आता अधिकच तीव्र झालेला आहे. याकरता मध्यंतरी तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. पालघर, ठाणे, रायगड आणि नवी मुंबईमधून असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलन कृती समितीने ठाकरे सरकारला आता १५ ऑगस्टपर्यंतचा पर्याय दिलेला असून विमानतळाला दि.बां.चे नाव नक्की करण्यासाठी १५ ऑगस्ट ही तारीख देण्यात आलेली आहे.