काँग्रेसने पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना काढून टाकताना जो विचार केला होता तो आता त्यांच्यावरच उलटला आहे. आज पंजाब ज्या स्थितीत आहे, त्यावरून हे स्पष्ट आहे की येणारा काळ काँग्रेससाठी कठीण असणार आहे.
माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केली आहे. माजी मंत्री नटवर सिंह म्हणाले की, राहुल यांच्यासह काँग्रेसमध्ये असा कोणताही नेता नाही जो पंतप्रधान मोदींना आव्हान देऊ शकेल. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे चांगला वक्ता तर आहेतच पण त्याचबरोबर एक निडर आणि धैर्यवान व्यक्ती आहेत.
नटवर सिंह यांनी एएनआयच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले, ‘तुम्हाला असे वाटते का ते पंतप्रधान मोदींसमोर उभे राहू शकतील? त्यावर ते म्हणाले की, जर तुम्हाला दोघांमधील फरक पाहायचा असेल तर पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांना वादविवाद करण्यास सांगा. राहुल गांधींची मुलाखत तुम्ही टीव्ही चॅनेलवरही पाहिली असेल. पंतप्रधान मोदी चांगले वक्ते आहेत. ते निडर आणि धैर्यवान आहेत. ते (राहुल गांधी) त्यांच्या (पंतप्रधान मोदी) विरोधात काहीही करू शकत नाही. काँग्रेसमध्ये असे कोणीही नाही जे मोदींना आव्हान देऊ शकेल, कारण ते एक महान वक्ते आहेत.’
हे ही वाचा:
दुबई एक्प्सोमध्ये ‘मुक्त, संधी आणि वाढ’ ही भारताची थीम!
“बापूंचे जीवन प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक” – पंतप्रधान मोदी
राम मंदिर ठरतंय ‘दुबई एक्सपो’ चा आकर्षण बिंदू
… म्हणून वाडा कोलमची अस्सल चव राहणार टिकून!
यूपीए सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्री असलेल्या नटवर सिंह यांनी काँग्रेस नेतृत्वावर आणि देशभरातील पक्षाचा पाया कमकुवत केल्याबद्दलही प्रश्न उपस्थित केले. त्यांनी गांधी कुटुंबाला यासाठी जबाबदार धरले आहे. पाच राज्यांतील काँग्रेसच्या निवडणूक संभावनांवर बोलताना ते म्हणाले की, ‘मला असे वाटत नाही की हा पक्ष भाजपाला पराभूत करू शकतो. जर त्यांनी भूमिका घेतली असती तर… पण… त्यांचा निर्णय वाईट आहे. गांधी कुटुंबाला कोणीही सल्लागार नाही आणि त्यांना वाटते की आम्ही तिस्मार खाँ आहोत.’
नटवर सिंह म्हणाले की, राहुल गांधी यांच्याकडे पक्षात कोणतेही पद नाही, पण तरीही ते निर्णय घेत असतात. सिंह यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षातील सध्याच्या संकटासाठी तीन लोक जबाबदार आहेत. त्यापैकी एक म्हणजे राहुल गांधी, ते कोणत्याही पदावर नसले तरी निर्णय घेत राहतात. नटवरसिंग यांनी पंजाब, छत्तीसगड आणि केरळमधील काँग्रेसच्या स्थितीबाबत राहुल गांधींवर वर टीका केली आहे. नटवर सिंह हे काँग्रेसमधील पहिले नेते नाहीत, ज्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. यापूर्वीही अनेक नेत्यांनी मोदींचे कार्य बघून त्यांचे कौतुक केले होते.