नटवर सिंह म्हणतात, काँग्रेसला मिळतील पाचपैकी शून्य

नटवर सिंह म्हणतात, काँग्रेसला मिळतील पाचपैकी शून्य

काँग्रेस नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांनी पुन्हा एकदा सोनिया गांधींवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, सोनिया गांधी या २१ वर्षे काँग्रेसच्या बॉस राहिल्या आहेत. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीवर प्रश्न विचारत ते म्हणाले की, ही बैठक केवळ फसवणूक आहे. सत्य हे आहे की, जे बाहेर गोंधळ घालत होते, ते बैठकीत गप्प राहिले. ते म्हणाले की, आगामी निवडणुकीत काँग्रेस पुन्हा प्रत्येक राज्यात पराभूत होईल.

‘एएनआय’शी बोलताना काँग्रेसचे माजी दिग्गज आणि माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह म्हणाले, ‘सीडब्ल्यूसीची बैठक ही केवळ औपचारिकता होती कारण सोनिया गांधी २१ वर्षे पक्षाच्या पूर्णवेळ बॉस आहेत. पक्षाध्यक्षांची पुढील निवडणूक सप्टेंबर २०२२ मध्ये होणार आहे. पक्षाध्यक्षपदासाठी कोणतीही जागा रिक्त नव्हती. सोनिया गांधी या पक्षाच्या बॉस आहेत. त्या गेल्या २१ वर्षांपासून पक्षाची धुरा सांभाळत आहेत.’

काँग्रेसचे माजी दिग्गज नेते म्हणाले की, शनिवारी झालेल्या सीडब्ल्यूसी बैठकीत कोणताही ठोस परिणाम झाला नाही कारण सभेपूर्वी आवाज उठवणारे सदस्यच बैठकीदरम्यान गप्प राहिले. सिंह म्हणाले, ‘काँग्रेस पक्षाने एकत्र काम केले पाहिजे अन्यथा ते राजकारणात भाजपपेक्षा मागे राहतील.’ नटवर सिंह म्हणाले, ‘पक्ष ज्या प्रकारे कामगिरी करत आहे, त्यावरून पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत पाचपैकी एकही राज्य जिंकणार नाही. पक्षामध्ये संघटना नसल्यामुळे वाटत नाही की, काँग्रेस पक्ष एकापेक्षा जास्त राज्यात आपला विजय प्राप्त करू शकेल. काँग्रेस व्यतिरिक्त जे विरोधी पक्षाची भूमिका बजावू शकतात असा दुसरा कोणता पक्ष नाहीं हेही आहेच,’ असे मत त्यांनी मांडले.

हे ही वाचा:

युवराज सिंगला का झाली अटक?

‘टोपे साहेब, आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच’

राज ठाकरेंच्या नावे खंडणी मागणारे पोलिसांच्या ताब्यात!

ठाण्यात ‘ढाण्या वाघा’चे पोस्टर्स; शिवसेनेला आव्हान दिल्याची चर्चा

सीडब्लूसी बैठक ही काँग्रेस पक्षाची सर्वोच्च संघटना आहे जी निवडणूक आणि इतर अनेक विषयांवर निर्णय घेते. शनिवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, त्यांच्याशी माध्यमांद्वारे बोलण्याची गरज नाही. ‘मी नेहमीच स्पष्टतेचे कौतुक केले आहे. माध्यमांद्वारे माझ्याशी बोलण्याची गरज नाही. आपण सर्वांनी खुली आणि प्रामाणिक चर्चा केली पाहिजे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वीही नटवर सिंह यांनी गांधी कुटुंबावर टीकास्त्र सोडले होते. दोन आठवड्यांपूर्वी नटवर सिंग यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना त्यांच्या पदावरून हटवल्याबद्दल गांधी कुटुंबावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, सध्या पक्षाची जी अवस्था आहे यासाठी फक्त तीन लोक जबाबदार आहेत. ते असेही म्हणाले होते की, राहुल गांधी यांच्याकडे कोणतेही पद नाही तरीही ते पक्षाचे सर्व निर्णय घेतात.

Exit mobile version