‘तांडव’ विरोधात देशभरात तांडव!

‘तांडव’ विरोधात देशभरात तांडव!

ॲमेझोन प्राईम वरिल ‘तांडव’ या वेब सिरीजमुळे देशभरात तांडव सुरू झाला आहे. या सारिजमधील काही आक्षेपार्ह दृष्य आणि संवादावरून देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली अशा विविध राज्यातून या सिरिज विरोधात प्रतिक्रीया उमटत आहेत.

महाराष्ट्रात भाजपा आमदार राम कदम यांनी या वेब सिरीज विरोधात घाटकोपर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून ओटीटी प्लॅटफॉर्म साठीही परिक्षण महामंडळांसारखी काहीतरी व्यवस्था असावी अशी मागणी आमदार राम कदम यांनी केली आहे.

हे ही वाचा: “…नाहीतर आम्ही ‘तांडव’ करू” – राम कदम

राम कदम यांच्या पाठोपाठ मध्य प्रदेशमधील मंत्री विश्वास सारंग यांनीदेखील प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून या सिरीजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. सारंग एवढ्यावरच थांबलेले नसुन त्यांनी ॲमेझोन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सिईओ) जेफ बेढोस यांनाही पत्र लिहून ‘तांडव’ ही सिरिज ॲमेझोन प्राईमवरून हटवण्यात यावी अशी मागणी केली आहे.

 

दिल्लीतील भाजपा नेते कपिल मिश्रा यांनी थेट ॲमेझोन प्राईम व्हिडिओला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्येही ‘तांडव’ वेब सिरीज हटवण्याची मागणी केली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये लखनऊच्या हजरतगंज पोलिस ठाण्यातही तांडव वेब सिरिज विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या या तक्रारीत ॲमेझोन प्राईम इंडियाच्या हेड अपर्णा पुरोहित, दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माते हिमांशु कृष्ण मेहर आणि लेखक गौरव सोलंकी यांच्या नावांचा समावेश आहे.

बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनीही ट्विट करत ‘तांडव’ सिरिज मधील आक्षेपार्ह दृष्ट काढण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Exit mobile version