पंढरपूर सारख्या पवित्र ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकता कामा नये

पंढरपूर सारख्या पवित्र ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकता कामा नये

महाराष्ट्रात पंढरपूर- मंगळवेढा पोट निवडणुक होऊ घातली आहे. त्यासाठी भाजपातर्फे समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर राष्ट्रवादीकडून भगिरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही पक्षांकडून आपापल्या उमेदवारासाठी जोरदार प्रचार केला जात आहे.

हे ही वाचा:

आमदारकीसाठी फोन, कोरोनाच्या बिकट परिस्थितीत पत्र

रेमडेसिव्हीरसाठी धावाधाव करू नका!

उत्तर प्रदेश सरकारची परतणाऱ्या मजूरांसाठी योजना तयार

मुंबईच्या डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ

अशातच माजी खासदार निलेश राणे यांनी देखील राष्ट्रवादीच्या विरोधात ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये राष्ट्रवादीला लक्ष्य करताना त्यांना खुनी, भ्रष्टाचारी, वसुलीखोर, बलात्कारी आणि हिंदू विरोधी म्हटले आहे. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात,

पंढरपूर सारख्या पवित्र ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येता कामा नाही. खुनी, भ्रष्टाचारी, वसुलीखोर, बलात्कारी आणि हिंदू विरोधी ताठ मानेने राष्ट्रवादी उमेदवाराचा प्रचार करतायत. पंढरपूर महाराष्ट्राचं श्रद्धेचं ठिकाण आहे तिथे ह्या बदमाशाना जागा मिळता कामा नये.

राष्ट्रवादीचे आमदार भरत भालके यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने रिक्त झालेल्या पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघात पोट निवडणुक लागली. त्यासाठी यापूर्वी देखील ताकदवान लढत देणाऱ्य समाधान आवताडे यांना भाजपातर्फे उमेदवारी देण्यात आली, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून भरत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली. यापूर्वी भरत भालके या मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून गेले होते.

Exit mobile version