केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून काश्मिरमध्ये आमूलाग्र बदल होऊ लागले आहेत. त्याचेच प्रतिबिंब आता जम्मू-काश्मीरच्या पोलिसांच्या देण्यात येणाऱ्या पदकामध्येही दिसते आहे. शेर ए काश्मीर म्हणवल्या जाणाऱ्या माजी मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांची या पदकांवरची छबी आता हटविण्यात आली असून त्यावर आता देशाचे राष्ट्रीय प्रतीक असलेला अशोकस्तंभ या पदकावर शोभून दिसणार आहे. जम्मू काश्मीर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
याआधी सरकारने शेर ए काश्मीर पोलिस पदक हे नाव बदलून ते जम्मू आणि काश्मीर पोलिस पदक असे केले होते.
वित्त आयुक्त आणि अतिरिक्त मुख्य सचिव राज कुमार गोयल यांनी सांगितले की, जम्मू काश्मीर पोलिस पदक योजनेतील चौथ्या परिच्छेदात शेख अब्दुल्ला यांचे चित्र पदकावर छापण्यात येते, पण आता भारत सरकारचे राष्ट्रीय बोधचिन्ह यापुढे तिथे छापले जाईल.
पदकाच्या दुसऱ्या बाजूला जम्मू काश्मीर राज्याचे बोधचिन्ह असेल. ही पदके शौर्यपदके म्हणून पोलिसांना देण्यात येतील.
याला नॅशनल क़ॉन्फरन्सचे प्रवक्ते इम्रान नबी दार यांनी विरोध केला आहे. इतिहासाला पुसून टाकण्याचा हा प्रयत्न आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पण असे असले तरी शेख अब्दुल्ला यांचे जम्मू काश्मीरच्या जनतेच्या हृदयात कायम स्थान कायम राहील.
हे ही वाचा:
‘यशवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचा उजवा हात’
बांगलादेशी मतदार तृणमुलच्या उमेदवार
‘पिझ्झा खाण्यापेक्षा भाकरी खा’
खाद्यतेलाच्या किमती खाली आल्या
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांनी म्हटले आहे की, अशी सगळी चिन्हे हटविली गेली पाहिजेत. शेख अब्दुल्ला यांनी ज्या विघटनवादी विचारधारेचा प्रचार केला त्याचा अंत व्हायलाच हवा. औरंगजेब, शहाजहान, अकबर यांना महान दाखविण्याचे दिवस आता गेले.