कल्याण सिंह यांच्या निधनाने देश हळहळला

कल्याण सिंह यांच्या निधनाने देश हळहळला

भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे शनिवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने देशभरातील कोट्यवधी नागरिक हळहळले आहेत. राम मंदिर निर्माण आंदोलनात त्यांचे योगदान मौल्यवान होते. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा नेते अतुल भातखळकर आदींनी शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘कल्याण सिंहजी हे एक राजकारणी, अनुभवी प्रशासक, तळागाळातील नेते आणि महान मानव होते. त्यांनी उत्तर प्रदेशच्या विकासासाठी अमूल्य योगदान दिले आहे. त्यांचा मुलगा श्री.राजवीर सिंह यांच्याशी बोलून मी शोक व्यक्त केला.’ असे मोदींनी सांगितले.

भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कल्याण सिंहजींच्या प्रति येणाऱ्या पिढ्या सदैव ऋणी राहतील. भारतीय मूल्यांमध्ये त्यांना दृढ विश्वास होता. आपल्या शतकानुशतके चालत आलेल्या जुन्या परंपरांचा त्यांना अभिमान होता.

कल्याणसिंहजींनी समाजातील उपेक्षित वर्गाच्या कोट्यावधी लोकांना आवाज दिला. त्यांनी शेतकरी, तरुण आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक प्रयत्न केले.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानातील भारतीय सुखरूप! कोणाचेही अपहरण नाही

हिंदुत्वाचे महामेरू कल्याण सिंह कालवश

मनसुख हिरेन नंतर कळवा खाडीत सापडला आणखीन एका उद्योजकाचा मृतदेह

अनिल देशमुखांना वॉरंट बजावणार का?

‘कल्याण सिंह जी यांच्या निधनाने आज देशाने एक सच्चा देशभक्त, प्रामाणिक आणि धर्माभिमानी राजकारणी गमावला आहे. बाबूजी हे इतके मोठे वटवृक्ष होते, ज्यांच्या सावलीखाली भाजपाची संघटना बहरली आणि विस्तारली. सांस्कृतिक राष्ट्रवादाचा खरा उपासक म्हणून त्यांनी आयुष्यभर देशाची आणि लोकांची सेवा केली.’ असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

तर योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, “दिवंगत आत्म्याला त्यांच्या चरणी स्थान द्यावे आणि शोकसंतप्त कुटुंबातील सदस्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी, अशी भगवान श्री राम यांची प्रार्थना.”

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ संदेश पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘आमचे नेते श्री कल्याण सिंह जी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थान, हिमाचलचे माजी राज्यपाल श्री.राम जन्मभूमी चळवळीतील त्यांचे योगदान आपल्या सर्वांच्या कायम स्मरणात राहील.’

‘हिंदुत्वाचे महामेरू कल्याण सिंह यांचे निधन झाले. आपले मुख्यमंत्री पद पणाला लावून भाजपाच्या या महान नेत्याने अयोद्धेतील राम मंदिर निर्मितीचा मार्ग प्रशस्थ केला. कल्याण सिंह यांनी घडवलेला इतिहास, त्यांचे योगदान भावी पिढ्या कायम लक्षात ठेवतील. भावपूर्ण श्रद्धांजली.’ असे भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

Exit mobile version