भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे शनिवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने देशभरातील कोट्यवधी नागरिक हळहळले आहेत. राम मंदिर निर्माण आंदोलनात त्यांचे योगदान मौल्यवान होते. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा नेते अतुल भातखळकर आदींनी शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘कल्याण सिंहजी हे एक राजकारणी, अनुभवी प्रशासक, तळागाळातील नेते आणि महान मानव होते. त्यांनी उत्तर प्रदेशच्या विकासासाठी अमूल्य योगदान दिले आहे. त्यांचा मुलगा श्री.राजवीर सिंह यांच्याशी बोलून मी शोक व्यक्त केला.’ असे मोदींनी सांगितले.
I am saddened beyond words. Kalyan Singh Ji…statesman, veteran administrator, grassroots level leader and great human. He leaves behind an indelible contribution towards the development of Uttar Pradesh. Spoke to his son Shri Rajveer Singh and expressed condolences. Om Shanti. pic.twitter.com/ANOU2AJIpS
— Narendra Modi (@narendramodi) August 21, 2021
भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कल्याण सिंहजींच्या प्रति येणाऱ्या पिढ्या सदैव ऋणी राहतील. भारतीय मूल्यांमध्ये त्यांना दृढ विश्वास होता. आपल्या शतकानुशतके चालत आलेल्या जुन्या परंपरांचा त्यांना अभिमान होता.
Generations to come will remain forever grateful to Kalyan Singh Ji for his contributions towards India’s cultural regeneration. He was firmly rooted in Indian values and took pride in our centuries old traditions.
— Narendra Modi (@narendramodi) August 21, 2021
कल्याणसिंहजींनी समाजातील उपेक्षित वर्गाच्या कोट्यावधी लोकांना आवाज दिला. त्यांनी शेतकरी, तरुण आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक प्रयत्न केले.
Kalyan Singh Ji gave voice to crores of people belonging to the marginalised sections of society. He made numerous efforts towards the empowerment of farmers, youngsters and women.
— Narendra Modi (@narendramodi) August 21, 2021
हे ही वाचा:
अफगाणिस्तानातील भारतीय सुखरूप! कोणाचेही अपहरण नाही
हिंदुत्वाचे महामेरू कल्याण सिंह कालवश
मनसुख हिरेन नंतर कळवा खाडीत सापडला आणखीन एका उद्योजकाचा मृतदेह
अनिल देशमुखांना वॉरंट बजावणार का?
‘कल्याण सिंह जी यांच्या निधनाने आज देशाने एक सच्चा देशभक्त, प्रामाणिक आणि धर्माभिमानी राजकारणी गमावला आहे. बाबूजी हे इतके मोठे वटवृक्ष होते, ज्यांच्या सावलीखाली भाजपाची संघटना बहरली आणि विस्तारली. सांस्कृतिक राष्ट्रवादाचा खरा उपासक म्हणून त्यांनी आयुष्यभर देशाची आणि लोकांची सेवा केली.’ असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
कल्याण सिंह जी के निधन से देश ने आज एक सच्चे राष्ट्रभक्त, ईमानदार व धर्मनिष्ठ राजनेता को खो दिया। बाबूजी एक ऐसे विराट वटवृक्ष थे, जिनकी छाया में भाजपा का संगठन पनपा व उसका विस्तार हुआ। सांस्कृतिक राष्ट्रवाद के एक सच्चे उपासक के रूप में उन्होंने जीवनभर देश व जनता की सेवा की। pic.twitter.com/ZvL3gAj7Yl
— Amit Shah (@AmitShah) August 21, 2021
तर योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, “दिवंगत आत्म्याला त्यांच्या चरणी स्थान द्यावे आणि शोकसंतप्त कुटुंबातील सदस्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी, अशी भगवान श्री राम यांची प्रार्थना.”
भारतीय राजनीति में शुचिता, पारदर्शिता व जन सेवा के पर्याय, अप्रतिम संगठनकर्ता एवं लोकप्रिय जननेता आदरणीय कल्याण सिंह जी का देहावसान संपूर्ण राष्ट्र के लिए अपूरणीय क्षति है।
उन्हें कोटि-कोटि श्रद्धांजलि!
— Yogi Adityanath (@myogiadityanath) August 21, 2021
प्रभु श्री राम से प्रार्थना है कि दिवंगत पुण्यात्मा को अपने श्री चरणों में स्थान दें और शोक-संतप्त परिजनों को दु:ख सहने की शक्ति प्रदान करें।
समाज, कल्याण सिंह जी को उनके युगांतरकारी निर्णयों, कर्तव्यनिष्ठा व शुचितापूर्ण जीवन के लिए सदियों तक स्मरण करते हुए प्रेरित होता रहेगा।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) August 21, 2021
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ संदेश पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘आमचे नेते श्री कल्याण सिंह जी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थान, हिमाचलचे माजी राज्यपाल श्री.राम जन्मभूमी चळवळीतील त्यांचे योगदान आपल्या सर्वांच्या कायम स्मरणात राहील.’
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, राजस्थान-हिमाचलचे माजी राज्यपाल श्री कल्याण सिंगजी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे.
राममंदिर आंदोलनात त्यांची भूमिका नायकाचीच होती.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांचे कुटुंबीय आणि सर्व कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. pic.twitter.com/f8PkpPaCSu— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 21, 2021
‘हिंदुत्वाचे महामेरू कल्याण सिंह यांचे निधन झाले. आपले मुख्यमंत्री पद पणाला लावून भाजपाच्या या महान नेत्याने अयोद्धेतील राम मंदिर निर्मितीचा मार्ग प्रशस्थ केला. कल्याण सिंह यांनी घडवलेला इतिहास, त्यांचे योगदान भावी पिढ्या कायम लक्षात ठेवतील. भावपूर्ण श्रद्धांजली.’ असे भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.
हिंदुत्वाचे महामेरू कल्याण सिंह यांचे निधन झाले. आपले मुख्यमंत्री पद पणाला लावून भाजपाच्या या महान नेत्याने अयोद्धेतील राम मंदिर निर्मितीचा मार्ग प्रशस्थ केला. कल्याण सिंह यांनी घडवलेला इतिहास, त्यांचे योगदान भावी पिढ्या कायम लक्षात ठेवतील. भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/4JWnisKCcv
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 21, 2021