‘मुघल हे तर राष्ट्र निर्माते!’ नासिरुद्दीन शहांचा जावई शोध

‘मुघल हे तर राष्ट्र निर्माते!’ नासिरुद्दीन शहांचा जावई शोध

आपल्या अभिनयासोबतच वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते नसिरुद्दीन शहा हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ‘मुघल हे राष्ट्र निर्माते होते’ असे विधान केल्यामुळे नसिरुद्दीन शाह यांच्या विरोधात टीकेची झोड उठलेली पाहायला मिळत आहे. पत्रकार करण थापर यांच्यासोबत एका ऑनलाईन कार्यक्रमात नसिरुद्दीन शहा हे सहभागी झाले होते. त्यावेळी बोलतानाच नसिरुद्दीन शहा यांनी आपले मुघल प्रेम जाहीर केले आहे.

काय म्हणाले नसिरुद्दीन?
“मुघलांनी केलेला ‘कथित’ अत्याचार वेळोवेळी ठळकपणे मांडला जातो, मात्र मुघल हे तेच लोक आहेत ज्यांनी या देशासाठी आपले योगदान दिले आहे हे मात्र आम्ही सोयीस्करपणे विसरतो” असे नसिरुद्दीन शहा यांनी म्हटले आहे. मुघल हे राष्ट्र निर्माणासाठी या देशात आले होते. आपण त्यांना रिफ्यूजी अर्थात आश्रित म्हणू शकतो असे देखील शहा यांनी म्हटले आहे. तर मुघलांनी या देशात स्थायी स्मारकांची निर्मिती केली आपल्या देशात संगीत, साहित्य, काव्य, नृत्य, चित्रकारी यामध्ये मुघलांचे योगदान आहे असे नसिरुद्दीन शहा म्हणाले. मुघल हे भारताला आपले घर बनवण्यासाठी आले होते असाही दावा त्यांनी केला.

हे ही वाचा:

‘राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकार स्थापण्याची मोदींची इच्छा होती!’ पवारांची नवीन पुडी

निवडणुकांच्या तोंडावर राहुल गांधी पुन्हा परदेशात पळाले

कालीचरण महाराजांना अटक

नारायण राणेंना सिंधुदुर्ग पोलिसांनी बजावलेली नोटीसच बेकायदेशीर

नसिरुद्दीन शहा यांच्या या मुक्ताफळांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. तर या व्हिडीओ वरून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. नसिरुद्दीन शहा यांच्या या मुघल प्रेमाबद्दल त्यांना नेटकरी धारेवर धरताना दिसत आहेत. दरम्यान याच कार्यक्रमात शहा यांनी आम्ही २० करोड मुस्लिम सहजा सहजी नष्ट होणार नाही असे आणखीन एक वादग्रस्त विधान शहा यांनी केले आहे.

Exit mobile version