शिवसेनेची तंतरली…‘त्या’ वक्तव्यावरून राणे यांना अटक करण्याचे आदेश

शिवसेनेची तंतरली…‘त्या’ वक्तव्यावरून राणे यांना अटक करण्याचे आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात महाराष्ट्रात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेले असताना आता नाशिक पोलिसांनी त्यांच्या अटकेचे आदेश दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यातील प्रमुख सत्ताधारी असलेल्या शिवसेनेची चांगलीच तंतरली असल्याचे म्हटले जात आहे. राज्यभरात भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेला मिळणार प्रतिसाद आणि ठाकरे सरकारच्या भोंगळ कारभारा विषयी व्यक्त होत असलेला आक्रोश हि या मागची प्रमुख करणे आहेत.

रायगड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल उद्गार काढले होते. मुख्यमंत्र्यांना देशाचा कितवा वर्धापनदिन माहीत नाही, यावरून कानशिलात लगावण्याचे वक्तव्य राणे यांनी केले होते. त्यावरून राणे यांच्यावर महाड, नाशिक येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नाशिक पोलिसांनी त्यांना अटक करण्याचे आदेश दिले. सध्या नारायण राणे चिपळुणात आहेत आणि तिथे त्यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचे पथक रवाना झाल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांच्या सहाय्यकांवर ईडीचे आरोपपत्र

टॅबचे पैसेच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करा!

खासगीकरणाच्या मार्गावर धावू लागली लालपरी

पंजाबमधील शाळा ओळखल्या जाणार हॉकीपटूंच्या नावाने!

नारायण राणे यांनी मुंबईपासून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. तिथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट देण्यावरून बराच वाद झाला होता. या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतल्यावर त्याचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शुद्धिकरण केले होते. त्याआधीही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका वेळोवेळी केली आहे. महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षांत आलेल्या संकटांनाही मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत, असे वक्तव्यही राणे यांनी केले होते. शिवाय, पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी कोकण दौऱ्यावर असतानाही मुख्यमंत्र्यांवर त्यांनी कठोर टीका केली होती.

आता या नव्या वक्तव्यामुळे राणे यांना अटक झाल्यास महाराष्ट्रात खळबळ उडणार आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात ही एक ऐतिहासिक घडामोड ठरू शकते. पण ही गोष्ट लोकशाही व्यवस्थेला धरून नसल्याच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

Exit mobile version